
सांगली, १ मे (वार्ता.) – जिल्ह्यातील कुंडल येथील जैन तीर्थ क्षेत्रावरील भगवान पार्श्वनाथांची प्रतिमा आणि पद्मावतीदेवीची प्रतिमा यांची विटंबना केल्याच्या प्रकरणाचा ‘जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळा’चे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांनी बैठकीत आढावा घेतला.
कुंडल येथील मंदिरात समाजकंटकांनी भगवान पार्श्वनाथांच्या मूर्तींची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित केली होती. जिल्हा पोलीस प्रमुख यांनी अन्वेषणासाठी विशेष पथक गठीत करून अन्वेषण करावे, अद्ययावत् तंत्रज्ञानाचे साहाय्य घेऊन या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करावे, अशा सूचना गांधी यांनी दिल्या. तीर्थक्षेत्राचा ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळांमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्ताव सिद्ध करावा. त्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळावा. पर्यटनस्थळी सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !