सकल हिंदु समाजाची आंदोलनाद्वारे चेतावणी

कोल्हापूर – पहलगाम येथे आतंकवाद्यांनी ‘हिंदु धर्मीय’ आहेत; म्हणून पर्यटकांची हत्या केली. याला हिंदु समाज ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देणार असून ‘यापुढील काळात नाव विचारूनच खरेदी करणार आणि १०० टक्के आर्थिक बहिष्कार’, अशी प्रतिज्ञा घेऊन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निर्धार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे २७ एप्रिल या दिवशी सकाळी निषेध आंदोलन करण्यात आले. त्या वेळी अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. येथे जागृती करण्यासाठी भव्य फलक लावला असून त्यावर अफझलखानवधाचे चित्र आहे, तसेच ४०० वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांनी ‘धर्म पालटला नाही; म्हणून त्यांची हत्या झाली आणि आताही २७ लोकांना धर्म विचारून हत्या झाली. यावरून स्थिती तीच आहे’, असे प्रबोधन करणारे लिखाण लिहिण्यात आले आहे.

या प्रसंगी हिंदु एकता आंदोलन, हिंदु महासभा, हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदु युवा प्रतिष्ठान, महाराज प्रतिष्ठान, ‘मराठा तितुका मेळवावा’, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेयवक संघ, शिवसेना, भाजप, भाजप युवामोर्चा यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष, तरुण मंडळे यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) बसस्थानकावर प्रवाशांच्या गैरसोयींचा ‘प्रवास’ चालूच !
सौंदळ (राजापूर) येथे आढळले अश्मयुगीन कातळशिल्प
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
यावर्षी देशात ९०, तर महाराष्ट्रात ९८ टक्के पावसाची शक्यता !
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६