‘वर्ष २०२३ च्या नवरात्रीच्या कालावधीत महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात देवीचे याग करण्यात आले. या यागाला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची उपस्थिती लाभली. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा, साधकांचे सर्वच स्तरांवर रक्षण व्हावे आणि ईश्वरी राज्याच्या स्थापनेतील सर्व अडथळे दूर होऊन शीघ्र ईश्वरी राज्य यावे’, यांसाठी महर्षीच्या आज्ञेने हे याग करण्यात आले. १५.१०.२०२३ या दिवशी करण्यात आलेल्या यज्ञाच्या वेळी मला कालीमातेचे विशाल रूप दिसले. तेव्हा मला तिचा केवळ चेहरा आणि केस दिसत होते. त्या वेळी कालीमातेच्या रूपाची मला जाणवलेली वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.


१. चेहरा
कालीमातेमध्ये मारक देवीतत्त्व होते, तसेच तिच्यात शिवतत्व असल्याने तिचा चेहरा राखाडी रंगाचा होता.
२. डोळे
कालीमातेमध्ये मारक शक्ती कार्यरत असल्याने तिचे डोळे मोठे आणि लाल होते.
कालीमातेचे चित्र पहातांना सुश्री (कु.) भाविनी कापडिया यांना आलेली अनुभूती आणि त्याचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले विश्लेषण

‘साधिकेने रेखाटलेले कालीमातेचे चित्र पहातांना ‘कालीमाता चित्रातून हळुवारपणे बाहेर येत आहे, म्हणजे ती प्रगट होत आहे’, असे मला जाणवले. तसेच कालीमाता चित्राच्या मध्यातून प्रगट होत असल्याचे मला जाणवले.’
– सुश्री (कु.) भाविनी कापडिया (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) (वर्ष २०२४)
साधिकेने रेखाटलेल्या कालीमातेच्या चित्रामध्ये मला ‘कालीमातेचे मुख म्हणजे कृष्णविवर आणि तिचे केस म्हणजे त्याभोवती फिरत असलेली ब्रह्मांडे’, असे जाणवले. चित्र रेखाटणार्या साधिकेलाही कालीमातेचे चित्र म्हणजे संपूर्ण विश्व जाणवले. लयाच्या वेळी सर्व ब्रह्मांडांचा कृष्णविवराच्या पोकळीत, म्हणजे आकाशतत्त्वात लय होतो. तसेच ब्रह्मांडांची उत्पत्तीही कृष्णविवराच्या पोकळीतून, म्हणजे आकाशतत्त्वातूनच होते. चित्र रेखाटणार्या साधिकेलाही ‘ती कालीमातेच्या चित्राच्या मध्यभागी खेचली जात आहे’, असे जाणवले. तसेच सुश्री (कु.) भाविनी कापडिया यांनाही ‘कालीमाता मध्यातून, म्हणजे कृष्णविवराच्या पोकळीतून प्रगट होत आहे’, असे जाणवले.’
– सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ (२३.७.२०२४))
३. जिव्हा
अ. कालीमातेची जिव्हा अमर्याद होती. तिच्यातील मारक तत्त्वामुळे ती अधिक निमुळतीही होती.
आ. वाईट शक्तींना खेचून त्यांना नष्ट करणे, तसेच साधकांमध्ये असलेला अहं नष्ट करणे, यांसाठी कालीमातेने तिची जिव्हा बाहेर काढली होती.
इ. कालीमातेची जिव्हा काळाचे प्रतीक आहे. कालीमातेच्या जिव्हेची लांबी शब्दांत सांगणे अशक्य आहे. कालीमातेने तिच्या जिभेने संपूर्ण विश्व व्यापून टाकले होते.
ई. कालीमाता तिच्या जिव्हेतील शक्तीने काळाच्या गतीला नियंत्रित करते. जसे आपण आपली जीभ आत-बाहेर करतो, तशी कालीमाता जिव्हेतील शक्तीच्या आधारे काळाची गती अल्प-अधिक करते.
उ. विश्वातील सर्व लीला तिच्या जिभेवर घडतात.
ऊ. कालीमातेच्या जिव्हेची लांबी लहान-मोठी रेखाटून मी चित्रांतील स्पंदनांचा अभ्यास केला. कालीमातेच्या जिव्हेच्या लांबीनुसार चित्रांतील स्पंदनांत पुढील भेद आढळला.
४. अलंकार कालीमातेने एकही अलंकार परिधान केलेला नव्हता. याची कारणे
अ. कालीमाता व्यापक आणि सर्व गोष्टींपासून अनासक्त होती.
आ. कालीमाता तिच्या निर्गुण आणि मारक शक्तीने भक्तांची आसक्ती नष्ट करत होती अन् त्यांना तिच्या व्यापक रूपाची जाणीव करून देत होती. भक्तांची आसक्ती नष्ट करण्याच्या प्रक्रियेद्वारे ती भक्तांमध्ये अलिप्तता निर्माण करत होती.
५. केस
अ. संपूर्ण विश्वच कालीमातेचे केस होते.
आ. तिच्या केसांमध्ये ब्रह्मांडातील नक्षत्रांचा समूह होता. एकेका नक्षत्राने कालीमातेच्या केसांना अलंकारांप्रमाणे सुशोभित केले होते.
इ. कालीमातेच्या केसांत सारे ब्रह्मांड सामावले होते. वास्तविक, तिचे केस जिथेपर्यंत होते, तिथपर्यंतच ब्रह्मांड होते. त्यापुढे आणखी काही नव्हते.
ई. तिच्या केसांची मंद हालचाल होत होती.
६. कालीमातेच्या रूपाची अन्य वैशिष्ट्ये
६ अ. कालीमातेचे रूप पूर्ण न दिसता तिचा केवळ चेहरा आणि केस दिसणे : कालीमातेच्या केसांनी तिचा देह झाकला गेला आहे. कालीमातेचे हे प्रचंड व्यापक रूप असल्याने तिचा संपूर्ण देह दिसणे आवश्यक नाही. देवतांना मानवाप्रमाणे देह नसतो. त्या शक्तीरूपात असतात. आवश्यक असलेल्या कार्यासाठी त्या कोणत्या ना कोणत्या रूपात प्रगट होत असतात. त्यामुळे कालीमाता ज्या कार्यासाठी प्रगट झाली आहे, त्यात केवळ चेहरा आणि केस दिसणे आवश्यक आहे. त्यामुळे कालीमातेचे रूप पूर्ण न दिसता तिचा केवळ चेहरा आणि केस दिसत आहेत.
६ आ. कालीमातेचे हे रूप व्यापक होते, तसेच काळ आणि ब्रह्मांड यांवर तिचे नियंत्रण होते.
६ इ. कालीमातेला असलेल्या दशभूजा संपूर्ण ब्रह्मांडाचे स्तंभ होत्या. कालीमातेच्या दशभूजांवर ब्रह्मांड स्थित होते. (‘कालीमातेच्या दशभूजा दाखवणे आवश्यक नाही’, असे मला वाटल्याने मी त्या चित्रात रेखाटलेल्या नाहीत.)
७. कालीमातेचे चित्र रेखाटतांना साधिकेला जाणवलेला त्रास आणि आलेल्या अनुभूती
७ अ. त्रास : कालीमातेचे चित्र रेखाटतांना मला भीती वाटत होती, तसेच मला तिची मारक शक्ती सहन होत नव्हती.
७ आ. अनुभूती
१. ‘कालीमातेच्या चित्राच्या मध्यभागी मी खेचली जात आहे’, असे मला जाणवत होते. त्या वेळी ‘कालीमाता माझ्यातील त्रासदायक शक्तीला स्वतःकडे खेचून नष्ट करत आहे’, असे मला जाणवले.
२. कालीमातेच्या तत्त्वाचा रंग काळा होता. त्यामुळे तिच्या दोन्ही चित्रांत मी पुष्कळ काळा रंग वापरला. असे असूनही त्या चित्रांत मला त्रासदायक स्पंदने जाणवली नाहीत.
८. शिकायला मिळालेली सूत्रे
अ. जेव्हा देवतेचे रूप अधिक व्यापक असते, तेव्हा ते (रूप) विश्वाशी एकरूप झालेले असते. त्यामुळे त्या देवतेचे चित्र अधिक अमूर्त बनते किंवा देवतेचे सर्व भाग दिसत नाहीत.
आ. कालीमातेचे चित्र रेखाटतांना मला ईश्वराच्या व्यापक आणि विशाल रूपाची जाणीव झाली. ‘ईश्वरापुढे मी, तसेच माझ्या समस्या किती छोट्या आहेत ?’, हे माझ्या लक्षात आले.’
– विदेशातील एक साधिका (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय २६ वर्षे) (२३.१०.२०२३)
|