मुंबईला पाणीपुरवठा करणार्या धरणांतील पाणीसाठा अर्ध्यापर्यंत !
मुंबई – कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्या धरणांतील पाणीसाठा अर्ध्यापर्यंत आला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्या मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडकसागर, भातसा, तानसा, तुळशी आणि विहार या ७ धरणांतून प्रतिदिन ३ सहस्र ९५० लिटर पाणीपुरवठा केला जातो. वर्षभर पाणी पुरेल यादृष्टीने सातही धरणांत १४ लाख ४७ सहस्र ३४३ दशलक्ष लिटर पाणी आवश्यक असते.