अभि वर्धतां पयसाभि राष्ट्रेण वर्धताम् ।
रय्या सहस्त्रवर्चसेमौ स्तामनुपक्षितौ ॥
– अथर्ववेद, काण्ड ६, सूक्त ७८, खण्ड २
अर्थ : हे पती-पत्नी गायींच्या दुधाने समृद्ध होवोत. त्यांना गायी इत्यादी समृद्धी प्राप्त होवो. हे दोघे पती-पत्नी अमर्याद तेज, धन आणि राज्य यांनी वर्धित होवोत.
इहैव ध्रुवां नि निनोमि शालां क्षेमे तिष्ठाति धृतमुक्षमाणा ।
तां त्वां शाले सर्ववीराः सुवीरा अरिष्टवीरा उप सं चरेम ॥
– अथर्ववेद, काण्ड ३, सूक्त १२, खण्ड २
अर्थ : आपण या ठिकाणी स्थिर दृढ गृह निर्माण करूया. हे गृह तूप इत्यादीने (सारतत्त्वांचे चिंतन करणारे) बनलेले, आपल्या कल्याणासाठी स्थित असावे. हे गृहा, आम्ही सर्वांनी तुझ्या सभोवती सुदृढ राहून आणि श्रेष्ठ संतान प्राप्त करून तुझ्याजवळ रहावे.
भावार्थ : एखादे उत्तम स्थान निवडून तेथे घर बांधले पाहिजे. गोपालन करून पुष्कळ दुधदुभते साठवले पाहिजे. घराच्या भोवतालचा परिसर आरोग्याला पोषक ठेवून आपले घर निरोगी राखले पाहिजे आणि आपल्या घरात सर्व प्रकारे वीरतेचे वातावरण बनवले पाहिजे.
(साभार : मासिक ‘गीता स्वाध्याय’, वर्ष १२)