शांत, स्‍थिर स्‍वभावाचे आणि साधकांना साहाय्‍य करणारे चि. आकाश श्रीराम अन् परिपूर्ण आणि तत्परतेने सेवा करणार्‍या चि.सौ.कां. मनीषा राऊत !

२१.२.२०२५ या दिवशी सोलापूर येथील साधक श्री. आकाश आनंद श्रीराम आणि रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या चि.सौ.कां. मनीषा किसन राऊत यांचा शुभविवाह जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथे होत आहे. त्या निमित्ताने सहसाधकांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. आकाश आनंद श्रीराम, सोलापूर

श्री. आकाश आनंद श्रीराम

१. ‘आकाश सर्वांशी प्रेमाने आणि अत्यंत नम्रतेने बोलतो.

२. कठीण परिस्‍थितीतही स्‍थिर रहाणे

काही वर्षांपूर्वी आकाशच्‍या जीवनात एक कठीण प्रसंग घडला होता. तेव्‍हा अत्‍यंत स्थिर आणि शांत राहून तो परिस्थितीला सामोरे गेला. त्याने सर्वकाही गुरूंवर सोपवले होते.

३. लहान वयातच संपूर्ण कुटुंबाचेे दायित्‍व घेणे

आकाशने स्‍वतःच्‍या बहिणीला शिक्षण घेण्‍यास साहाय्‍य केलेे आणि आपल्या आई-वडिलांचे संपूर्ण दायित्व घेतले.

४. इतरांना साहाय्‍य करणे

आकाश कोणत्‍याही स्थितीत इतरांना साहाय्‍य करण्‍यास तत्‍पर आणि सिद्ध असतो. वयोवृद्ध साधकांची सेवा तो चांगल्या प्रकारे आणि मन लावून करतो.

५. आकाशची सेवेची गती चांगली असून तो अल्‍प कालावधीत पुष्‍कळ सेवा करतो.

६. साधकांप्रती प्रेमभाव

काही दिवसांपूर्वी आकाश २ दिवसांसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आला होता. तेव्हा त्याला ‘साधकांसाठी काय करू आणि काय नको ?’, असे झाले होते. त्याने आश्रमात येतांना सर्वांसाठी खाऊ आणला होता.’

– सेवेशी संबंधित साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.२.२०२५)

________________________________________________

चि.सौ.कां. मनीषा राऊत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

चि.सौ.कां. मनीषा राऊत

१. आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे, फोंडा, गोवा. 

१ अ. तत्‍परतेने आणि नियोजनबद्ध सेवा करणे : ‘कु. मनीषा प्रत्‍येक सेवेचे व्‍यवस्‍थित नियोजन करते. तिला केव्‍हाही संपर्क करून सेवा सांगितली की, ती तत्‍परतेने सेवा करते, उदा. प्रत (प्रिंट) काढणे, ‘पार्सल’ घेणे, फलकावर सूचना लिहिणे, साधकांची औषधे वेळेत देणे, तसेच निरोप देणे इत्‍यादी.

ती कोणतीही सेवा समयमर्यादेत आणि परिपूर्ण करण्‍याचा प्रयत्न करते.’

२. आधुनिक वैद्य भिकाजी भोसले, फोंडा गोवा.

२ अ. वैद्यकीय सेवा शिकून इतरांना साहाय्‍य करणे : ‘मनीषाने ‘रक्‍तदाब तपासणे, ‘ईसीजी (हृदयालेख)’ काढणे, मलमपट्टी करणे’ इत्‍यादी सर्व शिकून घेतले आणि ती रुग्‍ण साधकांना साहाय्‍य करत असे.’

३. सौ. अंजना चव्‍हाण (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ६९ वर्षे), फोंडा, गोवा. 

३ अ. शिकण्‍याची वृत्ती : ‘मनीषा तिला अवगत नसलेली कोकणी भाषा लगेच शिकली, तसेच तिने स्‍वयंपाक घरातील सेवेसंबंधीचे बारकावे आनंदाने शिकून घेतले.’

४. सौ. राधा बनसोड, फोंडा, गोवा.

४ अ. सहसाधकांना आधार देणे : ‘मनीषाचा सहसाधकांना पुष्‍कळ आधार वाटतो. तिला कोणतीही अडचण विचारली, तर ती उपाय सुचवते आणि सेवेत साहाय्य करते.’

५. सौ. उर्मिला भुकन, फोंडा, गोवा.

अ. ‘मनीषा तिच्‍या आई-वडिलांना भावनिक स्‍तरावर न हाताळता नेहमी आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करते.

आ. मनीषा आणि मी वैद्यकीय विषयाच्या संबंधी सेवा करतो. ती मला साधना आणि सेवा यांमध्ये नेहमी साहाय्य करते.’

सर्व सूत्रांचा दिनांक (४.२.२०२५)

वधू आणि वर या दोघांसाठी उपयोगी पडतील, असे उखाणे

वृंदावनी कृष्‍णासंगे रास खेळे राधिका ।
…… चे नाव घेते मी हो सनातनची साधिका ॥

हनुमान आहे रामाचा प्रिय भक्‍त ।
…सह संसाराला आकार देईल साधनाच फक्‍त ॥