
‘संतसहवास मिळायला पुष्कळ भाग्य लाभते. साधकांनी संतांकडे अंतर्मुख दृष्टीने पाहिल्यासच त्यांना संतांमधील देवत्वाचा खरा लाभ होतो. ‘संतांचा सहवास लाभल्यावर त्यांच्यातील चैतन्याचा लाभ होण्यासाठी प्रार्थना करणे, ‘संत जे काही सांगतात ते आपल्या कल्याणासाठीच आहे’ असे समजणे, त्यांच्या गुणांचा अभ्यास करून ते गुण आपल्यात आणणे, त्यांच्याकडून आध्यात्मिक स्तरावर शिकणे, त्यांच्या सहवासात भावाच्या स्तरावर रहाणे’, यांसारखे प्रयत्न करणे, म्हणजे संतांकडे अंतर्मुख दृष्टीने पहाणे होय. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले त्यांच्या गुरूंसमोर कधीच बसायचे नाहीत, तर उभेच रहायचे आणि गुरूंनी सहज बोललेल्या प्रत्येक वाक्यातूनही शिकायचे ! संतांच्या सहवासात रहायला मिळणार्या साधकांनीही साधनेचे प्रयत्न वाढवायला हवेत.’
– (पू.) संदीप आळशी (२३.१०.२०२३)