ज्या परिसरामध्ये धर्मांधांची संख्या अधिक असते, तेथे त्यांचाच ‘कारभार’ आणि ‘अधिकार’ चालतो. तिथे हिंदूंना दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. ते सांगतील तसे हिंदूंना वागावे लागते; नाहीतर आक्रमणाला किंवा मरणाला तोंड देण्यास सिद्ध व्हावे लागते. सर्व संपत्ती सोडून पळून जावे लागते, तरच त्यांचा जीव वाचतो. मठ-मंदिरांवर, हिंदूंच्या मिरवणुकांवर जमावाने आक्रमणे केली जातात. संख्येने अधिक असूनही हातात शस्त्रे नसल्यामुळे हिंदूंना जीव वाचवण्यासाठी तेथून पलायन करावे लागते. अशा बातम्या हिंदूपर्यंत पोचल्या, तरी संघटित होऊन त्याला प्रतिकार करत नाहीत. तेथे त्यांची सहिष्णु आणि संकुचित वृत्ती आड येते.

मुसलमान मात्र त्यांच्या धर्माला चिकटून रहातात. ते कधीही हिंदूंच्या मठ-मंदिरात जात नाहीत किंवा पूजा करत नाहीत; मात्र हिंदू नेहमी पीराची पूजा करतात. मुसलमान फकिरांचा आशीर्वाद घेतात. त्यांचे रोजे (उपवास) करतात. गोल टोपी घालून ‘इफ्तार’ मेजवानीला जातात. एवढेच नाही, तर काही ठिकाणी मठ-मंदिरामध्ये इफ्तार मेजवानीचे आयोजन करून ती भ्रष्ट करतात. यामध्ये मुसलमानांचे लांगूलचालन करणारे जन्महिंदु राजकीय नेते मोठा सहभाग घेतात. येथेच हिंदूंचा सर्वधर्मसमभाव नडतो. या मनोवृत्तीमुळे धर्मांधांचे आणखी फावते. ते आणखी अत्याचार करतात. त्यामुळे हिंदूंनी धर्मांध आक्रमकांचा प्रतिकार करण्यासाठी संघटित झाले पाहिजे !