भिवंडी – येथील भोईवाडा भागात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणार्या ३ बांगलादेशींना पोलिसांनी कह्यात घेतले. मागील १५ वर्षांपासून ते भिवंडीत वास्तव्यास होते. त्यांच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला झाला आहे. तिघेही भिवंडी शहरात मजुरीचे काम करत होते. दलालांच्या माध्यमातून ते बांगलादेशातून भारतात आले होते. त्यानंतर त्यांनी बनावट कागदपत्रे सिद्ध केली होती.
संपादकीय भूमिकाबांगलादेशी नागरिकांचा सुळसुळाट झालेला महाराष्ट्र ! |