बांगलादेश आणि म्यानमार येथून आलेल्या घुसखोरांविरोधात कारवाई करा !

  • केंद्रीय गृह मंत्रालयाचे राज्याच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना निर्देश !

  • शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मागणीची नोंद घेतली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

मुंबई – बांगलादेश आणि म्यानमार येथून आलेल्या बेकायदा घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करा, असे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना दिले आहेत. शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी बेकायदा घुसखोरांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. त्याची नोंद घेत केंद्रीय गृह मंत्रालयाने तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. (स्वत:हून कारवाईचे निर्देश का दिले नाहीत ? – संपादक)

माजी खासदार राहुल शेवाळे यांनी २८ नोव्हेंबर २०२४ या दिवशी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना लिहिलेल्या निवेदनात ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ (टीस) या संस्थेकडून घुसखोरांविषयी केलेल्या सर्वेक्षणाचा उल्लेख केला होता. शेवाळे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, ‘टीस’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईत बांगलादेशी आणि म्यानमार येथून आलेल्या घुसखोरांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

हिंदूंच्या लोकसंख्येत घट ! 

वर्ष १९६१ च्या जनगणनेनुसार मुंबईत हिंदूंची लोकसंख्या ८८ टक्के होती. वर्ष २०११ च्या जनगणनेत हिंदूंची लोकसंख्या ६६ टक्क्यांपर्यंत घसरली. हीच टक्केवारी २०५१ पर्यंत ५४ टक्क्यांवर पोचेल, अशी भीती राहुल शेवाळे यांनी पत्रात व्यक्त केली आहे. नोंदणीकृत नसलेल्या अवैध सामाजिक संस्था घुसखोरांना रसद पुरवत असल्याचा आरोप शेवाळे यांनी केला आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशी घुसखोरांचे संकट दाराशी येईपर्यंत सुरक्षाव्यवस्था काय करत होती ?