Advocates Against Justice Shekhar Yadav : ‘न्यायमूर्ती शेखर यादव यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचा निर्देश द्या !’

सर्वाेच्च न्यायालयाच्या १३ अधिवक्त्यांची सरन्यायाधिशांना पत्र लिहून मागणी

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर यादव

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – सर्वोच्च न्यायालयातील १३ ज्येष्ठ अधिवक्त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या विरोधात गेल्या वर्षी मुसलमानांविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ८ डिसेंबर २०२४ या दिवशी न्यायमूर्ती यादव यांनी विश्व हिंदु परिषदेच्या समान नागरी कायद्याच्या संदर्भातील कार्यक्रमात ‘भारतात रहाणार्‍या बहुसंख्य लोकांनुसारच देश चालेल, कायदा हा बहुमताच्या जोरावरच चालतो’, असे विधान केले होते.

संपादकीय भूमिका

भारतात सत्य सांगणे गुन्हा झाला आहे आणि त्यात अधिवक्तेही सहभागी आहेत, हेच यातून लक्षात येते !