जो बायडेन शासनाचा निर्णय

वॉशिंग्टन – अमेरिकेने ‘भाभा अणूसंशोधन केंद्रा’सह भारतातील ३ प्रमुख अणूसंस्थांवरील निर्बंध हटवले आहेत. यामुळे अमेरिकेला भारताशी नागरी अणूतंत्रज्ञान सामायिक करण्याचा मार्ग मोकळा होईल. अमेरिकेच्या जो बायडेन शासनाने त्याच्या कार्यकाळाच्या शेवटच्या आठवड्यात आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांच्या भारत भेटीच्या एका आठवड्यानंतर ही घोषणा केली. वर्ष १९९८ मध्ये पोखरणमध्ये अणूचाचण्या केल्याने आणि आण्विक अप्रसार करारावर स्वाक्षरी न केल्याकारणाने अमेरिकेने ही बंदी घातली होती.
१. ‘यूएस् ब्युरो ऑफ इंडस्ट्री अँड सिक्युरिटी’ (बी.आय.एस्.)ने दिलेल्या माहितीनुसार ‘भाभा अणूसंशोधन केंद्रा’च्या (बी.ए.आर्.सी.) व्यतिरिक्त ‘इंदिरा गांधी सेंटर फॉर अणूसंशोधन’ (आय.जी.सी.ए.आर्.) आणि ‘इंडियन रेअर अर्थ्स’ (आय.आर्.ई.) यांच्यावरीलही बंदी उठवण्यात आली आहे. तिन्ही संस्था भारताच्या अणूऊर्जा विभागाच्या अंतर्गत काम करतात आणि अणूऊर्जेच्या क्षेत्रात होणार्या कामावर लक्ष ठेवतात.
२. अमेरिका आणि भारत हे शांततापूर्ण अणूसहकार्य, त्या अनुषंगाने संबंधित संशोधन आणि विकास उपक्रम यांना पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहेत, असे ‘बी.आय.एस्.’ने म्हटले आहे.
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !