दाभोळ (जिल्‍हा रत्नागिरी) येथील कु. पूनम सुधाकर गुरव यांना आलेल्‍या अनुभूती

रामनाथी (गोवा) येथे सनातनच्‍या आश्रमात शिबिर झाले. त्‍या वेळी साधिका कु. पूनम सुधाकर गुरव यांना आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

१. शिबिराच्‍या पहिल्‍या दिवशी स्‍वतःमध्‍ये पालट होत असल्‍याचे जाणवणे 

‘शिबिराच्‍या पहिल्‍या दिवशी ‘सत्र’ करतांना मला जाणवले, ‘माझ्‍या शरिरात काहीतरी पालट होत आहेत, उदा. माझ्‍यावरील त्रासदायक शक्‍तीचे आवरण झटकन निघून गेले आहे. माझ्‍या शरिराच्‍या रोमारोमांत चैतन्‍य पसरत आहे. कधीही एकाग्र न होणारे माझे मन आज पटकन एकाग्र होत आहे.’ माझ्‍या व्‍यष्‍टी साधनेत पालट झाल्‍याचे मला जाणवत होते. मला वातावरणात वेगळ्‍याच प्रकारची सात्त्विक स्‍पंदने जाणवली. त्‍या वेळी माझा भाव जागृत होत होता.

२. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍याकडून सोनेरी प्रकाश अधिक प्रमाणात प्रक्षेपित होत असल्‍याचे जाणवून संपूर्ण शरिरावर रोमांच उभे रहाणे 

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आम्‍हा सर्व साधकांशी बोलत होत्‍या. तेव्‍हा त्‍यांना पाहिल्‍यानंतर जाणवले, ‘त्‍यांच्‍याकडून प्रक्षेपित होणारा सोनेरी प्रकाश अधिक प्रमाणात पसरला आहे.’ त्‍या वेळी मला वातावरणात वेगळाच पालट जाणवत होता. माझ्‍या शरिरात जी नकारात्‍मक ऊर्जा होती, ती नष्‍ट झाली. माझ्‍या संपूर्ण शरिरावर रोमांच उभे राहिले आहे.

३. पू. (कै.) होनपकाका यांचे अंतिम दर्शन घेतांना भाव जागृत होणे, तसेच त्‍यांचे शरीर पूर्णपणे सुवर्णमयी दिसणे 

पू. होनपकाका यांनी देहत्‍याग केला. तेव्‍हा त्‍यांचे अंतिम दर्शन घेतांना माझी भावजागृती झाली. पू. (कै.) होनपकाका यांचे शरीर पूर्णपणे सुवर्णमयी दिसत होते.

४. गुरुदेवांचा सत्‍संग चालू असतांना त्‍यांचे संपूर्ण शरीर गुलाबी रंगाचे दिसणे, तसेच चैतन्‍याची स्‍पंदने आणि सुगंधी हवेची हलकीशी झुळुक आल्‍याचे जाणवणे 

जेव्‍हा गुरुदेवांचा सत्‍संग चालू होता. तेव्‍हा मला गुरुदेवांचे पूर्ण शरीर गुलाबी रंगाचे दिसत होते. त्‍या वेळी चैतन्‍याची स्‍पंदने जाणवली आणि सुगंधी हवेची हलकीशी झुळुक आली इत्‍यादी पालट माझ्‍या लक्षात आले.

मला हे सर्व अनुभवता आले. यासाठी मी गुरुदेवांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

– कु. पूनम सुधाकर गुरव (वय २१ वर्षे), दाभोळ, जिल्‍हा रत्नागिरी.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक