MasoodAzhar Jihadi Campaign Against India : आतंकवादी मसूद अझहर याची भारतात जिहादी मोहीम चालू करण्याची धमकी !

आतंकवादी मसूद अझहर

इस्लामाबाद – भारतात आतंकवादी आक्रमणांच्या प्रकरणात सुरक्षायंत्रणांना हवा असणारा जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर २० वर्षांनंतर पहिल्यांदाच समोर आला आहे. मसूद अझहर याने जैश-ए-महंमदच्या सदस्यांना संबोधित केले आहे. त्याने पाकिस्तानमध्ये दिलेल्या त्याच्या ताज्या भाषणात भारत आणि इस्रायल यांच्या विरुद्ध नव्याने जिहादी मोहीम चालू करण्याविषयी चेतावणी दिली आहे.

१. याविषयीच्या एका वृत्तानुसार अझहर याने आतंकवादी संघटनांच्या नेत्यांना जगात इस्लामची सत्ता आणण्यासाठी जिहादमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

२. तो त्याच्या भाषणात ‘भारत, तुझा मृत्यू येत आहे’, असे वारंवार ओरडत होता.

३. वर्ष २०२२ मध्ये पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी मसूद अझहर अफगाणिस्तानात पळून गेल्याची घोषणा केली होती.

४. अझहर हा २००१ मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या आतकंवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आहे. या प्रकरणी त्याला पाकिस्तानात कारागृहात टाकण्यात आले; पण त्याच्यावर कधीही कारवाई झाली नाही. वर्ष २०१६ मध्ये पाकिस्तानी अधिकार्‍यांनी त्याच्या अटकेचे वर्णन ‘संरक्षणात्मक कोठडी’ असे केले होते.

संपादकीय भूमिका

अझहर याच्यासारख्या पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या मुसक्या आवळून त्यांना शिक्षा होण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?