|
जयपूर (राजस्थान) – कुणाच्या बापाची लायकी नाही की, आमची संपत्ती जप्त करेल. आमची संख्या का लपवता ? ज्यादिवशी आम्ही रस्त्यावर उतरू, त्या दिवशी तुमचा आत्मा कापेल. आमचे तरुण घाबरट नाहीत. आम्ही आमच्या तरुणांना नियंत्रणात ठेवले आहे. ज्या दिवशी ते नियंत्रणाबाहेर जातील, त्यांना रोखणे तुमच्या अवाक्यातली गोष्ट नसेल, अशी धमकी येथील इत्तेहाद-ए-मिल्लत परिषदेचे प्रमुख मौलाना तौकीर रझा खान यांनी दिली. त्यांनी येत्या १७ नोव्हेंबरला देहली येथे एकत्र येऊन संसदेला घेराव घालण्याचे आवाहन केले.
‘The day we take to the streets, your soul will shudder in terror!’ – Maulana Taufeer Raza Khan, Ittehad-e-Millat Parishad
Ittehad-e-Millat Council chief Maulana Taufeer Raza Khan’a threat to the central government!
A Call has been raised to siege the Parliament on 17th… pic.twitter.com/TJt2n3kmU9
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 12, 2024
मौलाना खान पुढे म्हणाले की, संसदेच्या सत्रास प्रारंभ होत आहे. जर तुम्हाला (मुसलमानांना) तुमची शक्ती दाखवायची असेल आणि तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी करून हव्या असतील, तर तुम्हाला देहलीला यावे लागेल. सरकार अप्रामाणिक आहे. कुराण आणि अल्ला यांचा अपमान करणारे सरकार सत्तेवर आहे. जर तुम्हाला त्रास होत असेल आणि तुम्ही प्रामाणिक असाल, तर तुम्ही देहलीला या. आपण तिरंगा घेऊन जाऊ. जर सरकारने ऐकले नाही, तर प्रशासनाकडे जाऊ. त्यानंतर जे होईल, ते सरकारचे दायित्व असेल.
संपादकीय भूमिकासातत्याने अशी विधाने करण्याचे रझा यांचे धाडस होतेच कसे ? सरकारचा वचक नसल्याचेच हे दर्शक आहे का ?, असा प्रश्न उपस्थित होतो ! |