गुरुकृपेने साधिकेचा आध्यात्मिक त्रास उणावल्याने तिला साधनेतील आनंद मिळत असल्याबद्दल तिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी वाहिलेले पत्ररूपी कृतज्ञतापुष्प !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प.पू. गुरुदेव,

शिरसाष्टांग नमस्कार !

कु. सिद्धि गावस

देवा, आज मला पुष्कळ आनंद होत आहे. तो मी तुझ्या चरणी अर्पण करत आहे. बर्‍याच वर्षांपासून, म्हणजे माझ्या जन्मापासूनच मी माझे स्वभावदोष, अहं आणि आध्यात्मिक त्रास यांमुळे दुःखी होते. आता ही स्थिती पालटली आहे. आता ‘माझ्या भाग्यात केवळ आनंदी रहाणेच लिहिले आहे’, असे मला वाटते. त्यामुळे माझा आध्यात्मिक त्रास आणि नकारात्मकताही उणावत आहे. यासाठी तूच माझ्याकडून पुढील प्रयत्न करून घेतलेस.

१. मनाविरुद्ध घडत असतांना मी ‘देव माझ्या मनोलयासाठी हा प्रसंग घडवत आहे’, असा भाव ठेवल्यामुळे त्या परिस्थितीत मला सर्वांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते.

२. परिस्थितीविषयी कृतज्ञता वाटल्याने मला ‘माझ्या मनासारखे व्हावे’, या विचाराचा विसर पडला आणि मला इतरांच्या आनंदासाठी झटणे शक्य होऊ लागले.

३. मला इतरांचा सहवास आनंददायी वाटू लागला.

४. ‘देवाच्या इच्छेनुसार सर्व घडत असल्याने मला केवळ देवाच्या ‘हो’मध्ये ‘हो’ मिळवायचे आहे’, असा भाव ठेवल्याने या प्रसंगात ‘देवाची माझ्यावर कृपा कशी होत आहे !’, असे माझे चिंतन होते आणि ‘देवाने मला आशीर्वादच दिला आहे’, असे मला वाटते.

५. जेव्हा माझ्याकडून इतरांच्या चांगल्या गोष्टींशी स्वतःची तुलना होते, तेव्हा मला वाटते, ‘देवाने इतरांचे चांगले केले आणि माझे पुष्कळच चांगले केले आहे. कुणाला स्थुलातून आनंद मिळतो, तर कुणाला निर्गुणातून (अप्रत्यक्षपणे) आनंद मिळतो.’

आतापर्यंत माझ्या स्वभावदोषांमुळे माझे कुटुंबीय आणि माझ्या संपर्कात येणारे साधक यांना त्रास झाला. त्यांनी आतापर्यंत मला समजून घेतले आणि मला प्रेमच दिले; म्हणून मी साधना करू शकत आहे. माझ्याकडून प्रयत्न करून घेणारे साधकरूपी गुरुदेवच आहेत.

‘हे गुरुदेवा, ‘माझ्या पेशीपेशीमध्ये सतत शरणागती रहावी’, अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करते. ‘जीवनातील प्रत्येक प्रसंगात आनंदी कसे रहायचे ?’, हे शिकवल्याबद्दल तुमच्या चरणी कृतज्ञता !

– कु. सिद्धि गावस, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.९.२०२४)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक