पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत, तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत दिवाळीनिमित्त ‘सनातनचे आकाशकंदिल आणि भेटसंच’ यांच्या वितरणासाठी साधकांनी वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न केले. त्यांपैकी पुणे जिल्ह्यातील साधकांनी केलेले प्रयत्न येथे दिले आहेत. २८ ऑक्टोबरला याचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/848926.html
५. तळेगाव
५ अ. परिचयातील लोकांना भेट देण्यासाठी आकाशकंदिलांची मागणी करणारे श्री. गौतम घोष (वाचक) यांचे मित्र श्री. ज्ञानेश्वर साठे !
यांना ‘सनातन संस्थे’च्या आकाशकंदिलाचे चित्र दाखवले आणि तेथे उपस्थित असलेले त्यांचे मित्र श्री. ज्ञानेश्वर साठे यांनाही आकाश कंदिलाविषयी सांगितले. त्या वेळी त्यांच्या मित्राने स्वतःच्या परिचयातील लोकांना भेट देण्यासाठी लगेच काही आकाशकंदिलांची मागणी दिली. श्री. साठे यांना दैनिक ‘सनातन प्रभात’ दाखवून त्याचे महत्त्व सांगितले. तेव्हा ते लगेच दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार झाले.
५ आ. आकाशकंदिलाच्या माध्यमातून हिंदु धर्माचा प्रसार होत असल्याने आकाशकंदिल स्वतः विकत घेऊन ते इतरांना विनामूल्य देणारे
श्री. राजचंद्र यादव (‘सनातन प्रभात’चे वाचक) !
श्री. यादव यांचे ‘समोसा आणि नाश्ता सेंटर’ आहे. त्यांनी आकाशकंदिलांची मागणी दिली होती. त्यांनी त्यांच्या काही मित्रांना आकाशकंदिलाचे महत्त्व सांगितले. तेव्हा मित्रांनीही मागणी दिली. ‘आकाशकंदिलाच्या माध्यमातून हिंदु धर्माचा प्रसार होईल आणि प्रसार सर्वत्र व्हावा’, या उद्देशांनी त्यांनी ते इतरांना दिले. आम्ही त्यांना अन्य व्यक्तींकडून पैसे घेण्याविषयी सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘धर्म का कार्य है । धर्म का कार्य तो करना ही चाहिए ।’’ त्यांची कुणाकडूनही पैशाची अपेक्षा नव्हती. ‘‘प्रत्येक महिन्याला अर्पण घेऊन जा’’, असेही त्यांनी आम्हाला सांगितले.’
६. विश्रांतवाडी
६ अ. साधकांनी सनातनची उत्पादने घालून एक भेटसंच सिद्ध करून दाखवल्यावर भेटसंच घेणारे वाचक आणि जिज्ञासू !
एका वाचकाने ‘सनातन भेटसंचा’ची मागणी दिल्यावर साधकांनी त्यांना सनातनची विविध उत्पादने घालून एक भेटसंच सिद्ध करून दाखवला. ते पाहून त्यांनी आणखी काही भेटसंच घेतले. समाजातील आणखी एका जिज्ञासूला ‘सनातन भेटसंच’ दाखवल्यावर त्यांनीही भेटसंच विकत घेतले.’
– श्री. नारायण शिरोडकर (वय ६१ वर्षे), विश्रांतवाडी, पुणे.
७. हडपसर
७ अ. जिज्ञासू महिलांच्या साहाय्याने आकाशकंदिल बनवण्याची सेवा करणार्या सौ. दीपाली कोकाटे (धर्मप्रेमी) !
‘सौ. कोकाटे यांनी प्रवचनाला येणार्या त्यांच्या परिसरातील जिज्ञासू महिलांच्या साहाय्याने ६७ आकाशकंदिल बनवण्याची सेवा केली. मागणीचे आकाशकंदिल दिल्यावर ‘हिशोब घेणे आणि त्यांची व्यवस्थित नोंद करून ठेवणे’, या सेवाही त्यांनी चांगल्या केल्या.
७ आ. अपघातात हाताला दुखापत झाली असतांना ५० आकाशकंदिल सिद्ध करणारे श्री. संतोष नान्नीकर (साधक) !
सप्टेंबर २०२३ मध्ये संतोष यांचा मोठा अपघात होऊन अपघातात त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. असे असूनही त्यांनी ५० आकाशकंदिल सिद्ध केले. त्यांनी ही सेवा अल्प कालावधीत पूर्ण केली. या सेवेतून त्यांना पुष्कळ आनंद मिळाला.
केंद्रबैठकीत सर्व साधकांनी मिळून ५०० आकाशकंदिल वितरण करण्याचे ध्येय घेतले होते. ‘साधक, नातेवाईक, धर्मप्रेमी, साधना सत्संगातील जिज्ञासू आणि नवीन जोडलेले जिज्ञासू’ हे सर्वजणही आकाशकंदिल बनवण्याच्या सेवेत सहभागी झाले होते. त्यामुळे अल्प कालावधीत आकाशकंदिल बनवून वेळेत त्यांचे वितरण करता आले. काही मंदिरांत आकाशकंदिल लावत असतांना जिज्ञासूंनी ‘आम्हालाही असा आकाशकंदिल मिळेल का ?’, असे विचारले आणि कंदिलाची मागणी दिली. केंद्रातील सर्व साधकांना आकाशकंदिलांची सेवा करतांना पुष्कळ आनंद अनुभवता आला.’
(समाप्त)
– संग्राहक : पू. (साै.) मनीषा महेश पाठक, पुणे (२०.११.२०२३)