सद्गुरु राजेंद्रदादा (टीप) म्हणजे देवद आश्रमातील प.पू. गुरुदेव प्रत्यक्ष ।
प्रत्येकाच्या साधनेकडे असे त्यांचे बारकाईने लक्ष ।।
साधना असो वा असो वैयक्तिक समस्या ।
साधकांना नेहमीच आधार वाटतो सद्गुरु दादांचा ।। १ ।।
सद्गुरु दादा म्हणजे देवद आश्रमातील संत शिरोमणी असती ।
येथील चैतन्य टिकून रहाण्याचे ते प्रमुख माध्यम असती ।।
शब्द असती त्यांचे गुरुदेवांसारखे ।
त्यांना पहाताक्षणी दाटून येई मन कृतज्ञतेने ।। २ ।।
सद्गुरु दादा असती दैवी गुणांची खाण ।
परंतु आम्हा अज्ञानी जिवांची, नेहमीच अल्प पडे ही जाण ।।
त्यांचीच तळमळ दिसून येई, आमच्या आध्यात्मिक प्रगतीची ।
खरे सांगू, तेच करती प्रयत्नांची पराकाष्ठा, आम्हाला घडवण्यासाठी ।। ३ ।।
सद्गुरु दादांमध्ये असे सर्वांप्रती प्रीती ।
निरपेक्षतेची असती ते जणू सगुण मूर्ती ।।
सल्ला असे त्यांचा नेहमीच साधना वाढवण्याचा ।
नरजन्माचे सार्थक करूनी आनंदाप्रत जाण्याचा ।। ४ ।।
आहे वाढदिवस सद्गुरु दादांचा ।
चैतन्याचे होणारे प्रक्षेपण ग्रहण करण्याचा ।।
कोटीशः कृतज्ञता व्यक्त करूनी ।
निश्चय करूया साधना वाढवण्याचा ।। ५ ।।
टीप – सद्गुरु राजेंद्र शिंदे
– कु. लीना कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |