उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. अभयराम मुसलीकंठी हा या पिढीतील एक आहे !
बेंगळुरू (कर्नाटक) येथील ५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. अभयराम मुसलीकंठी (वय ६ वर्षे) याचा आश्विन कृष्ण नवमीला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई सौ. भार्गवी मुसलीकंठी यांच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
याला ६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !
सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानदं परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
जन्म ते १ वर्ष
‘मी नामजप करत असतांना चि. अभयराम प्रतिसाद द्यायचा, तसेच नामजप केल्यावर तो टाळ्याही वाजवायचा.
वय १ ते २ वर्षे
१. सहनशीलता : सुटीमध्ये आम्ही तमिळनाडूमध्ये कांचीला गेलो होतो. तेव्हा तिथे पुष्कळ गर्दी असल्याने आम्हाला अडीच घंटे थांबावे लागले, तरीही त्याने कसलाच त्रास दिला नाही. तो शांत राहून श्लोक म्हणत होता.
२. देवाची आवड : एकदा आम्ही त्याच्या आजोबांकडे गेलो असतांना त्याने आजोबांना घरात पूजा करतांना पाहिले. त्यानंतर तोही त्याच प्रकारे पूजा करत होता.
३. धर्माचरणाची आवड : अभयरामला नेहमी टिळा लावण्यास आवडतो. त्याची स्मरणशक्ती चांगली आहे. मी म्हणत असलेले काही श्लोक तो शिकला. तो प्रतिदिन १० श्लोक न चुकता म्हणतो.
४. तो प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी क्षमायाचना करून झोपतो.
५. प्रार्थना केल्यावर पुरोहिताने खोबर्याची वाटी प्रसाद म्हणून देणे : मी अभयरामला घेऊन मंदिरात गेल्यावर अनेक वेळा पुरोहित त्याला प्रसाद देतात. एकदा कामाक्षी मंदिरात जातांना मी त्याच्यासाठी जेवण घेऊन गेले नव्हते. त्या वेळी मी कामाक्षीदेवीला प्रार्थना केली, ‘माझ्या मुलाला तूच जेवण दे.’ थोड्या वेळानंतर तेथील एका पुरोहिताने खोबर्याची वाटी प्रसाद म्हणून अभयरामच्या हातात दिली.
– सौ. भार्गवी मुसलीकंठी, बेंगळुरू, कर्नाटक. (१.६.२०२४)
यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यू ट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |