सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्‍य मार्गदर्शन आणि साधकाला झालेले त्यांचे गुणदर्शन !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या (गुरुदेवांच्या) सत्संगात मला पुष्कळ काही शिकायला मिळाले. या सत्संगात साधकांनी विचारलेले प्रश्न आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेली उत्तरे पुढे दिलेली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

या लेखाचा काही भाग २१ ऑक्टोबर २०२४ या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया. 

या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/846524.html

६. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेले नामजप करत स्वयंपाक करण्याचे महत्त्व !

साधक : आश्रमातील अन्न खाल्ल्याने मला हलकेपणा जाणवत आहे. आश्रमातील अन्न जेवढे सात्त्विक असते, तेवढे घरातील अन्न सात्त्विक असत नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : घरी नामजप करत स्वयंपाक केल्याने अन्नात सात्त्विकता येईल. त्यामुळे घरी नामजप करत स्वयंपाक करावा.

श्री. प्रणव मणेरीकर

७. आश्रमात साधना चांगली होत असल्याने ‘अनिष्ट शक्ती साधकांना आश्रमापासून दूर घेऊन जातात’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगणे 

साधक : आश्रमात राहिल्याने मला अनिष्ट शक्तींचा त्रास होतो. (प्रश्न विचारणार्‍या साधकाला आध्यात्मिक त्रास आहे. – संकलक)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आता आपत्काळाला आरंभ झाला आहे. त्यामुळे आश्रमात येऊन रहाणे आणि साधना करणे महत्त्वाचे आहे. आश्रमात राहिल्याने साधना चांगली होते. त्यामुळे अनिष्ट शक्ती साधकांना आश्रमापासून दूर घेऊन जाण्याचा  प्रयत्न करतात.

(‘गुरुदेवांच्या सांगण्यातून ‘साधकांनी आश्रमाचा लाभ करून घेऊन आनंदी रहावे, ही तळमळ व्यक्त होत होती.’ – श्री. प्रणव मणेरीकर)

अशा प्रकारे या सत्संगातून गुरुदेवांमधील अनेक गुणांचे मला दर्शन झाले. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे गुण स्वतःत आणण्यासाठी प्रयत्न करायचा’, असा माझा विचार दृढ झाला.’

(समाप्त)

– श्री. प्रणव अरुण मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४४ वर्षे), मथुरा सेवाकेंद्र, मथुरा.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक