देश पुन्‍हा फाळणीच्‍या उंबरठ्यावर … ?

भारत-पाक फाळणीनंतर स्‍थलांतरितांचा जीवघेणा प्रवास

काँग्रेसचा १५० वर्षांचा इतिहास पाहिला, तर ‘मुसलमानांचा अनुनय हाच’ तिचा एककलमी कार्यक्रम आहे. काँग्रेसच्‍या स्‍थापनेत पुढाकार घेणारी व्‍यक्‍ती ब्रिटीश होती. ‘काँग्रेसच्‍या स्‍थापनेपासूनच मुसलमानांशी जुळवून घेतले नाही, तर भारताचा स्‍वातंत्र्यलढा यशस्‍वी होणार नाही’, असे हिंदु जनमानसावर बिंबवण्‍यात आले. गांधीजींच्‍या उदयानंतर मुसलमानांच्‍या तुष्‍टीकरणाने उच्‍चांक गाठला. हिंदु समाज राजकीयदृष्‍ट्या झोपलेला असल्‍याने काँग्रेसने देशाचे तुकडे करणार्‍या फाळणीला मान्‍यता देऊनही हिंदूंनी ती स्‍वीकारली. त्‍याचा परिणाम लाखो हिंदूंचे शिरकाण होण्‍यात झाला. तरीही हिंदूंनी काँग्रेसलाच पायघड्या घातल्‍या. फाळणी होऊनही काँग्रेसने सत्ता उपभोगण्‍यासाठी मुसलमानांचा अनुनय चालूच ठेवला. परिणामस्‍वरूप देशभरात मुसलमानांची लोकसंख्‍या अनैसर्गिक पद्धतीने वाढली. बहुसंख्‍य असूनही हिंदूंवर अल्‍पसंख्‍य मुसलमान अत्‍याचार करत आहेत. भारतातील मुसलमान आज ‘गजवा-ए-हिंद’ (काफिरांना ठार करण्‍यासाठीचे युद्ध) करण्‍याची सिद्धता करत आहेत.

राहुल गांधींच्‍या हातात सत्ता आल्‍यास… ?

श्री. धैवत वाघमारे

एक पाऊल फाळणीकडे… ? हो ! काँग्रेस राज्‍य करत असलेल्‍या राज्‍यांमध्‍ये मुसलमानांचे कोडकौतुक चालू आहे. तेथे मुसलमान हिंदूंना उघड उघड आव्‍हान देत आहेत. भाजपशासित राज्‍यांमध्‍ये मुसलमानांची लोकसंख्‍या डोईजड होत आहे. जे काँग्रेसशासित राज्‍यांत घडते आहे, तेच काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेले राजकीय पक्षही त्‍यांच्‍या प्रभावाखालील राज्‍यांत करत आहेत. राहुल गांधींनी ज्‍या प्रकारे मुसलमानांचा अनुनय केला, ते पहाता असे वाटू लागले आहे की, त्‍यांच्‍या हातात सत्ता आल्‍यास ते गांधीजींना मागे टाकून संपूर्ण देशाला इस्‍लामी राष्‍ट्रे, चीन इत्‍यादींच्‍या घशात घालतील.

हिंदूंनो, आताच जागे व्‍हा ! अन्‍यथा जी वेळ ज्‍यू धर्मियांवर आली, तीच वेळ हिंदूंवरही ओढवेल !

– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१०.२०२४)