१. कु. अपाला औंधकर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने होणार्या संशोधन कार्यात सहभागी झाल्यावर तिचे नातेवाईक आणि समाजातील व्यक्ती यांनी तिच्या आईला अनावश्यक प्रश्न विचारणे
‘दोन वर्षांपूर्वी माझी मुलगी (कु. अपाला अमित औंधकर, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे) महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने होणार्या संशोधन कार्यात सहभागी झाली. तेव्हा समाजातील व्यक्ती ‘तिच्या शिक्षणाचे कसे होणार ? तिचे पुढे कसे होईल ? ती काय करणार आहे ? आता ती काय करते ?’, असे अनावश्यक प्रश्न विचारत होत्या. त्या वेळी मी त्यांना केवळ ‘अपाला चांगले कार्य करत आहे. मला तिला साहाय्य करायचे आहे. तिचे भविष्य चांगलेच असेल’, असे सांगत असे.
२. एका प्रथितयश आस्थापनाकडून कु. अपालाचा तिने वेगळे क्षेत्र निवडल्यामुळे सत्कार होणे
वर्ष २०२४ मधील महिलादिनानिमित्त रत्नागिरी येथील ‘आयसीआयसीआय प्रुडेंशिअल लाईफ इंश्युरन्स’ या आस्थापनाच्या वतीने अपालाचा सत्कार केला गेला. त्या आस्थापनातील अधिकार्यांनी सांगितले, ‘‘अन्य मुलांपेक्षा अपालाने वेगळे क्षेत्र निवडले आहे आणि ती इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करत आहे. त्यामुळे आम्ही तिचा सत्कार करत आहोत.’’
३. नातेवाईक आणि समाजातील व्यक्ती यांचा सकारात्मक प्रतिसाद लाभणे
नंतर वर्ष २०२४ मध्ये समाजातील व्यक्ती आणि नातेवाईक यांच्याकडून आम्हाला मिळणार्या प्रतिसादात पालट होत असल्याचे माझ्या लक्षात येत आहे. पूर्वी नातेवाईकही मला शंकायुक्त दृष्टीने प्रश्न विचारायचे; पण आता त्यांना ‘कु. अपाला, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय आणि त्याचे कार्य’ यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते अन् त्यांच्याकडून येणारा प्रतिसादही सकारात्मक असतो.
अनेक पालकांनी मला सांगितले, ‘‘तुमच्या मुलीचे भविष्य चांगलेच आहे’, हे आम्हाला दिसत आहे. आम्हाला आमच्या मुलांच्या भविष्याविषयी काळजी वाटत आहे.’’
मला गुरुदेवांची कृपा अनुभवता आली. ‘गुरुदेवांच्या कृपेने परिस्थितीमध्ये १०० टक्के पालट होतो’, याची मला अनुभूती घेता आली’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. दीपा औंधकर (कु. अपालाची आई), रत्नागिरी (९.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |