अजमेर (राजस्थान) येथील सरकारी शाळेतील घटना
अजमेर (राजस्थान) – येथे एका सरकारी शाळेत स्वतः नमाजपठण करून मुलांनाही नमाजपठण करण्यास बाध्य केल्याच्या प्रकरणी एका मुसलमान शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. त्याच वेळी आणखी एका मुसलमान शिक्षिकेवर कारवाई करण्यासाठी शिक्षण विभागाला पत्र लिहिण्यात आले आहे. आसमा परवीन आणि शगुफ्ता अशी या शिक्षिकांची नावे आहेत. ही घटना ब्यावर खास माध्यमिक विद्यालयात घडली आहे.
राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी सांगितले होते की, शिक्षक शाळा सोडून नमाजपठण करण्यासाठी जाऊ शकत नाहीत. प्रार्थना आणि पूजा यांच्या नावाखाली शाळेतून गायब रहाणार्या शिक्षकांवर कारवाई केली जाईल. एखाद्या शिक्षकाला धार्मिक कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल, तर तो सुटी घेऊ शकतो.
संपादकीय भूमिकामुसलमान कितीही शिकले आणि उच्च पदावर पोचले, तरी ते धर्मांचाच अधिक विचार करतात, हे लक्षात घ्या ! |