१. सौ. जयश्री श्रीकांत ग्रामोपाध्ये, पुणे
अ. ‘रामनाथी आश्रमात प्रवेश करताच साधकांनी माझे प्रसन्न वदनाने स्वागत केले.
आ. मला साधकांमध्ये कर्तव्यपूर्ततेची जाणीव आणि देवाविषयीचा भाव जाणवला.
इ. आमच्या घराजवळ श्री यवतेश्वराचे (महादेवाचे) जागृत देवस्थान आहे. तेथे गेल्यानंतर माझा नामजप अखंड होतो. तशाच प्रकारे आज रामनाथी आश्रमात पाऊल टाकताच माझा नामजप अखंड चालू झाला.’ (१९.१०.२०२३)
२. श्री. अभिजित वि. भोसले आणि सौ. पूजा अ. भोसले, सातारा.
अ. ‘हिंदु राष्ट्राच्या उत्पत्तीचे मूळ रामनाथी आश्रमात आहे.
आ. आज गोव्यात पाऊल ठेवताच दारूची दुकाने, तसेच तेथील वातावरण पाहून आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला, ‘ही वाढती अराजकता कशी संपणार ?’ आमच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आज आम्हाला रामनाथी आश्रमात आल्यावर मिळाले.