नंदुरबार येथील पू. (श्रीमती) केवळबाई पाटीलआजी (वय ८० वर्षे) यांना नामजप करतांना आणि श्री गणेशाची मूर्ती पहातांना आलेल्‍या अनुभूती

पू. (श्रीमती) केवळबाई पाटील

१. श्री नारायणीदेवीचा नामजप करतांना आलेल्‍या अनुभूती

‘सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांनी मला श्री नारायणीदेवीचा एक सहस्र आठ वेळा नामजप करायला सांगितला आहे. मी हा नामजप नियमित करते. हा नामजप करत असतांना मला आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

अ. मी हा नामजप करणे चालू केल्‍यावर पहिल्‍या वेळी मला शुभ्र वस्‍त्र परिधान केलेल्‍या आणि हातात पाण्‍याचा कलश असलेल्‍या देवीचे दर्शन झाले.

आ. त्‍यानंतर दुसर्‍या आणि तिसर्‍या वेळी मला लाल वस्‍त्र परिधान केलेल्‍या अन् हातात आरतीचे ताम्‍हण असलेल्‍या देवीचे दर्शन झाले.

२. मी ‘श्री हनुमते नमः।’ हा नामजप करत असतांना मला सुवर्णालंकार धारण केलेल्‍या गदाधारी बाल हनुमानाचे दर्शन झाले.

३. सद़्‍गुरु नंदकुमार जाधव घेत असलेल्‍या ‘ऑनलाईन’ सत्‍संगात संगणकीय पडद्यावर शाडूच्‍या मातीपासून बनवलेली श्री गणेशमूर्ती दाखवली जात होती. मला ‘ती मूर्ती सुवर्णाची आहे’, असे दिसत होते.’

– पू. (श्रीमती) केवळबाई पाटील (सनातनच्‍या ६८ व्‍या संत (वय ८० वर्षे), नंदुरबार (२२.७.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक