२२.२.२०२२ या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या’ अंतर्गत भारतीय शास्त्रीय संगीतात अलंकार असणारे श्री. प्रदीप चिटणीसकाका यांनी संगीतातील शुद्धस्वर (सप्त स्वर) विविध लयीत म्हटल्यावर सूक्ष्म स्तरावर झालेला परिणामाचा अभ्यास येथे दिला आहे. त्या वेळी देवाच्या कृपेने मिळालेले ज्ञान पुढीलप्रमाणे आहे.
१. विविध लयीत शुद्धस्वर म्हटल्यावर सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम
टीप १ – श्री. चिटणीसकाका स्थुलातून स्वर म्हणत असतांना त्यांची वैखरी वाणी कार्यरत होती. प्रयोगाच्या मध्ये काही क्षण ते मोठ्याने स्वर न म्हणता मनातल्या मनात म्हणत होते. तेव्हा त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्यामुळे जेव्हा ते वरील स्वर त्यांच्या मनात (मोठ्याने नाही) म्हणत होते, तेव्हा त्यांची मध्यमा वाणीही कार्यरत झाली होती.
२. सप्तस्वरांचे आध्यात्मिक महत्त्व
जेव्हा श्री. चिटणीसकाका अनिष्ट शक्तींचा त्रास नसणार्या साधकांच्या समोर तिन्ही प्रकारातील स्वर गात होते, तेव्हा त्या स्वरांशी संबंधित असणार्या उच्च लोकाचे वायुमंडल प्रयोगाच्या ठिकाणी सूक्ष्मातून निर्माण झाले होते. जेव्हा श्री. चिटणीसकाका वाईट शक्तींचा त्रास असणार्या साधकांच्या समोर तिन्ही प्रकारांतील स्वर गात होते, तेव्हा त्या स्वरांशी संबंधित असणारी शक्ती आणि चैतन्य यांच्या लहरी सप्तपाताळांकडे प्रक्षेपित झाल्या. यावरून ‘भारतीय शास्त्रीय संगीतातील सप्तस्वरांमध्ये सप्तलोकांतील शक्ती आणि चैतन्य ग्रहण करण्याचे अन् ते आवश्यकतेनुसार सप्तपाताळांकडे प्रक्षेपित करून तेथील अनिष्ट शक्तींशी सूक्ष्म युद्ध करण्याचे आध्यात्मिक सामर्थ्य आहे’, हे सूत्र शिकायला मिळाले.
कृतज्ञता : ‘श्री गुरूंच्या कृपेने सप्तस्वरांच्या संदर्भात वरील अनुभूतीजन्य ज्ञान मिळाले’, यासाठी मी श्री गुरुचरणी कृतज्ञ आहे.’ – सुश्री (कु.) मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.२.२०२२)
|