आनंदी, शांत आणि गुरुकार्याची तळमळ असलेले धुळे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. किशोर अग्रवाल (वय ६९ वर्षे) !

श्री. किशोर अग्रवाल

१. आधुनिक वैद्या जागृती डांग, मुंबई

१ अ. ‘श्री. किशोर अग्रवालकाका नेहमी आनंदी असतात. त्यांचा चेहरा शांत वाटतो. त्यांच्या चेहर्‍यावर पुष्कळ तेज जाणवते.

१ आ. गुरुकार्याची तळमळ : काका नियतकालिक ‘सनातन प्रभात’ आणि सात्त्विक उत्पादने यांचे वितरण, तसेच अर्पण अन् विज्ञापने गोळा करणे इत्यादी सेवा दुचाकी वाहनावरून करतात. ते वयस्कर असूनही चिकाटीने परिपूर्ण सेवा करतात. एकदा त्यांना त्यांच्या डोळ्यांचे शस्त्रकर्म करायला सांगितले होते. त्यांनी गुरुपौर्णिमेच्या वेळी अर्पण गोळा करण्याची सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या डोळ्यांचे शस्त्रकर्म करून घेतले. एकदा जळगाव येथे त्यांच्या एका नातेवाइकाचे निधन झाले. तिथे गेल्यावर त्यांनी ओळखीच्या व्यक्तींकडून अर्पण मिळवण्याची सेवा केली.

१ इ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : काका रविवारचा भाववृद्धी सत्संग न चुकता ऐकतात. ते ‘नामजप, स्वतःभोवतालचे त्रासदायक आवरण काढणे आणि सारणी लिखाण करणे’, हे सर्व प्रयत्न नियमितपणे करतात.’

२. श्री. पीयूष खंडेलवाल, धुळे

अ. ‘काका सर्वांशी नेहमी प्रेमाने बोलतात.

आ. त्यांना दिलेली सेवा ते समयमर्यादेत पूर्ण करतात.

इ. त्यांना दिलेली सेवा अपूर्ण राहिली, तर ते त्या संदर्भातील चूक स्वतःहून सांगतात.’

३. श्री. मयूर बागुल, धुळे

अ. ‘काकांनी साधकांना माझ्या लग्नपत्रिका वाटण्याची सेवा ‘गुरुसेवा’, या आध्यात्मिक भावाने केली होती.’

४. सौ. प्रमिला राहुल मोरे, धुळे  

४ अ. सेवेची तळमळ : ‘माझ्या घराकडे जाणारा मार्ग अतिशय खराब होता. तिथे सायकलही व्यवस्थित चालवू शकत नाही, अशी स्थिती आहे. काका वयस्कर असूनही त्या मार्गावरून दुचाकी वाहनाने ‘सनातन प्रभात’चा अंक देण्यासाठी नियमित यायचे.’

५. श्री. वसंत पाटील, नंदुरबार

५ अ. नियोजनबद्ध सेवा करणे : ‘मी धुळे येथे सेवेला गेल्यावर काका मला साहाय्य करायचे. मी बसस्थानकावर पोचण्याच्या आधी १५ मिनिटे ते मला घेण्यासाठी तेथे येऊन थांबायचे. ज्या जिज्ञासूंना भेटायचे आहे, त्यांची सूची ते आधीच काढून ठेवायचे, तसेच जिज्ञासूंना त्यांच्या भेटण्याची वेळ विचारून त्याप्रमाणे त्यांना भेटण्याचे नियोजन करायचे.

५ आ. सेवेची तळमळ

१. महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिरपूर (जिल्हा धुळे) येथे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन केले होते. तेव्हा काकांना काही कारणास्तव राजस्थान येथे जावे लागले. काका राजस्थान येथून भ्रमणभाष करून ‘ग्रंथप्रदर्शनाच्या संदर्भात काही अडचण नाही ना ?’, असे मला विचारत होते.

२. ‘देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी समाज जागृत झाला पाहिजे’, अशी त्यांची तळमळ असते.

३. काकांनी आतापर्यंत ‘मला थकवा आला आहे. त्यामुळे आता मला सेवा नको’, असे कधीही म्हटले नाही.

४. काकांना एखादी सेवा अकस्मात् सांगितली, तरीही ते स्थिर राहून आनंदाने ती सेवा करण्यास होकार देतात.’

६. श्रीमती जयश्री बोरसे, धुळे

६ अ. ‘काकांकडे पाहून मला आनंद आणि उत्साह वाटतो.

६ आ. सेवाभाव : काका झोकून देऊन सेवा करतात. २ वर्षांपूर्वी शहरातील एका भागात सात्त्विक उत्पादनांचा कक्ष लावला होता. त्या वेळी अकस्मात् जोराने वारा वाहू लागला. त्या परिस्थितीतही काका गुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी सर्व सोपवून एकदम स्थिर राहून सेवा करत होते.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २८.७.२०२४)