रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्री. दीपक भा. पाठक, अमरावती, ममहाराष्ट्र.

अ. ‘आश्रम पाहून सात्त्विक आणि पवित्र वातावरणात आल्यासारखे वाटले.’ (२६.६.२०२४)

२. श्री. केतन ह. शेंडे, मुळगाव, खोपोली, जिल्हा रायगड, महाराष्ट्र. 

अ. ‘मनोमन असे वाटते, ‘सगळे सोडून साधनेसाठी इथेच येऊन रहावे.’

३. कोमल प्रकाश साठे, रायगड, महाराष्ट्र.

अ. ‘सहसा आपण आपल्या चुका मान्य करत नाही; पण इथे चुका मान्य केल्या जातात’, हे भोजनकक्षातील फलकावर लिहिलेल्या चुका बघून वाटले.

आ. फलकावर चुका लिहिणे हा पुष्कळ वेगळा उपक्रम वाटला.’

४. सौ. नीता प्र. मुरांजन (आध्यात्मिक नाव – विद्यामूर्ती), ठाणे, महाराष्ट्र.

अ. ‘अभूतपूर्व शांती, स्थैर्य, अनुशासन यांचे उत्तम उदाहरण !

आ. आश्रमात आल्यावर भोजनकक्षात प्रवेश केला. तेव्हा भोवताली दृष्टी फिरवल्यावर ‘सर्व जण पुष्कळ परिचयाचे आहेत आणि मी इथे नवीन नाही’, हाच भाव माझ्या मनात निर्माण झाला.’

५. श्री. अशोक दिनकर पाटील, गडहिंग्लज, कोल्हापूर, महाराष्ट्र. 

 अ. ‘हिंदु राष्ट्र’ लवकरात लवकर निर्माण व्हावे आणि ते सर्व राष्ट्रांच्या पुढे-पुढे जावे’, असे मला वाटले. ’

६. सौ. स्मिता रमेश पाटील, गडहिंग्लज, कोल्हापूर, महाराष्ट्र.

अ. ‘आपले कार्य पुष्कळ मोठे आहे, तरी ते नक्की पूर्ण होईल.

आ. प्रत्येक भारतियाने हे कार्य अंगीकारले पाहिजे.’

७. सौ. आरती राजेश पाटील, गडहिंग्लज, कोल्हापूर, महाराष्ट्र.

अ.  ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण करण्यासाठी साधकांचे समर्पण आवडले. हे आवश्यक आहे.’

८. कु. प्रणिता रमेश पाटील, गडहिंग्लज, कोल्हापूर, महाराष्ट्र.

अ. ‘सनातनचा आश्रम पुष्कळ मोठा असून या आश्रमाचे कार्य मोठे आहे.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : ३०.६.२०२४ )