पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्याप्रती अत्यंत कृतज्ञताभाव असलेले खानापूर, जिल्हा बेळगाव येथील श्री. पुंडलिक पाटील !

पू. निर्मला दातेआजी

१. खानापूर, जिल्हा बेळगाव येथून दुचाकी गाडीवरून अडीच घंटे प्रवास करून पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांचे दर्शन घेण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येणे 

श्री. पुंडलिक पाटील

‘वर्ष १९९४ ते २००३ या कालावधीत श्री. पुंडलिक पाटील पुणे येथे सेवा करत असत. त्या वेळी त्यांचे पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (सनातनच्या ४८ व्या संत, वय ९१ वर्षे) यांच्या निवासस्थानी सतत येणे-जाणे असे. वर्ष २००३ नंतर ते खानापूर, जिल्हा बेळगाव येथे रहायला गेल्यावर त्यांचा पू. दातेआजींशी संपर्क राहिला नाही. त्यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘पू. दातेआजी रुग्णाईत आहेत’, असे  वाचले. तेव्हा त्यांना वाटले, ‘तातडीने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जाऊन पू. आजींचे दर्शन घ्यावे.’ पुंडलिकदादा संबंधित साधकांना विचारून १७.८.२०२४ या दिवशी दुचाकी गाडीवरून अडीच घंटे प्रवास करून पू. आजींचे दर्शन घेण्यासाठी आले.

२. पू. दातेआजींनी केलेल्या प्रीतीबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे

श्री. नरेंद्र दाते

दादांनी २० वर्षांनी पू. दातेआजींचे दर्शन घेतले. पू. आजींनी त्यांना जे प्रेम दिले, त्याविषयी आठवून दादांची सारखी भावजागृती होत होती. दादा म्हणाले, ‘‘पू.आजींनी मला अगदी घरातील व्यक्तीप्रमाणे वागवले. पू. आजींनी तुम्हाला (पू. आजींची दोन्ही मुले आणि सुना यांना) जसे प्रेम दिले, तसेच त्यांनी मला दिले. त्यांनी कधीच तुमच्यात आणि माझ्यात भेदभाव केला नाही. हे मी कधीच विसरू शकत नाही. ‘आज पू. आजी आणि तुम्हा सर्वांना भेटून माझ्या कुटुंबियांनाच मी भेटत आहे’, असे मला वाटत आहे.’’

३. पुंडलिकदादांची भावावस्था पाहून आमचीही भावजागृती झाली.

४. ‘अंतरी असलेला खरा कृतज्ञतेचा भाव जागृत रहाण्यासाठी स्थळ आणि काळ यांची मर्यादा नसते, तसेच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृती करणेही किती महत्त्वाचे आहे !’, हे दादांकडून आम्हाला शिकता आले. 

‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव साधकांना घडवत आहेत. ते आम्हाला साधकांच्या माध्यमातून शिकवत आहेत’, त्याबद्दल मी त्यांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– डॉ. नरेंद्र दाते (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.८.२०२४)