मुसलमान तरुणाने बुद्धीभेद केल्याचा कुटुंबियाचा आरोप
मंडी (हिमाचल प्रदेश) – येथील एका ब्राह्मण कुटुंबातील मुलीने इस्लाम स्वीकारला असून ती घरी नमाजपठण करते. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी औट पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल ) केली आहे. यात म्हटले आहे, ‘‘आमची मुलगी घरात इस्लामशी संबंधित नमाजपठण वगैरे कृत्ये करत असल्यामुळे संपूर्ण घरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. आमच्या मुलीचा बुद्धीभेद करण्यात आला असून त्यामागे एका मुसलमान तरुणाचा हात आहे.’’
Brahmin girl accepts I$l@m in Himachal Pradesh.
The Mu$l!m youth brainwashed our daughter.’ – allege the family members.
👉If Hindu parents impart Dharmic values into their children from the beginning, such incidents could be averted.
👉We never hear a Mu$l!m girl performing… pic.twitter.com/PQJXvIMynW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 18, 2024
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, मंडी येथील ही हिंदु मुलगी पंजाबमध्ये शिकत होती. पंजाबमधून आल्यानंतर त्यांच्या मुलीने इस्लामशी संबंधित कृत्ये करणे चालू केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून ठोस कारवाई करावी, अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुबियांनी पोलिसांकडे केली आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंनी त्यांच्या मुलांना लहानपणी धर्मशिक्षण दिले असते, तर त्यांच्यावर अशी वेळी ओढवली नसती ! एखाद्या मुसलमान मुलीने तिच्या घरात हिंदु धर्मानुसार पूजा-अर्चा केल्याचे कधी ऐकले आहे का ? हिंदूंनी आता तरी आपल्या पाल्यांना लहानपासूनच साधना आणि धर्माचरण शिकवावे ! |