५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला दक्षिण कन्नड येथील कु. गगनदीप गौडा (वय ११ वर्षे)

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. गगनदीप गौडा हा या पिढीतील एक आहे !

       आज भाद्रपद शुक्ल चतुर्दशी (१७.९.२०२४) या दिवशी कु. गगनदीप गौडा याचा ११ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या वडिलांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. गगनदीप गौडा

कु. गगनदीप गौडा याला ११ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्री. बेबी गौडा

१. वय ३ ते ४ वर्षे

१ अ. देवाची आवड : ‘चि. गगनदीप गौडा वडिलांसह झाडावरील फुले काढून देवाला फुले वहात असे. तसेच त्याला माझ्या समवेत देवाची पूजा करायला आवडायचे.

२. वय ५ वर्षे

२ अ. आम्ही गगनसह सत्संगाला जायचो तेव्हा तो शांत रहायचा.

२ आ. धर्माचरण : गगन सकाळी लवकर उठून देवाची पूजा करायचा. तो गुरुदेवांच्या चरणांवर फुले वहाणे, आरती आणि प्रार्थना करणे, हे सर्व प्रतिदिन करीत आहे. तो शाळेत जाण्यापूर्वी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करतो, नंतर मोठ्यांना नमस्कार करून शाळेत जातो.

३. वय ७ वर्षे

३ अ. गगन सनातन संस्थेच्या सेवेत भाग घ्यायचा. आता तो पुष्कळ तळमळीने सेवा करीत आहे.

३ आ. गुरूंविषयी श्रद्धा : गगन शाळेत असतांना गुरुदेवांचे स्मरण करतो. त्याला उत्तर आले नाही, तर तो गुरुदेवांना प्रार्थना करतो.’

– श्री. बेबी गौडा (वडील), दक्षिण कन्नड (६.७.२०२४)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.