कल्याण – असलम मुल्ला आणि रेहान यांनी अखिल भारतीय गोरक्षा महासंघाचे संजय रामसंजीवन सुमन यांचे अपहरण केले. त्यानंतर दुर्गाडी जवळील एका तबेल्यात नेऊन बेदम मारहाण केली. गोमांस असलेला टेंपो पोलिसांना पकडून दिल्यावरून या धर्मांधांनी या गोरक्षाकाला मारहाण करून ‘‘पुन्हा गोमांस असलेला टेंपो पोलिसांना पकडून दिला, तर जिवंत गाडू’’, अशी धमकी दिली. सुमन यांनी पूर्वी या धर्मांधाचा गोमांसाचा टेंपो पकडून दिल्यामुळे त्यांच्यावर अवैध गोमांस वाहतुकीवरून कारवाई केली होती. त्यानंतर सुटले आहेत.
सुमन हे मूळचे उल्हासनगर येथील आहेत. गोरक्षण, तसेच गोवंशियांच्या मांसाची तस्करी होऊ नये; म्हणून गोरक्षा महासंघाचे कार्यकर्ते कार्य करतात. नॅशनल उर्दु हायस्कूल समोरील रस्त्यावरील गोविंदवाडी वळण रस्त्यावर धर्मांधांनी त्यांचे अपहरण केले. मारहाण करून आरोपींनी सुमन यांना एका मोटारीतून पत्रीपूल भागात सोडून दिले. याविषयी सुमन यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणी हिंदु संघटनांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
संपादकीय भूमिकाकल्याण येथील धर्मांध गोतस्तकर गोरक्षकांच्या जिवावर उठले ! पोलीस धर्मांधांना अभय देत असल्यामुळेच गोतस्कर धर्मांध गोरक्षकांच्या जिवावर उठले आहेत. अवैध गोमांस प्रकरणी या धर्मांधांना पोलिसांनी सोडलेच नसते, तर गोरक्षकावर ही वेळ का आली असती ? राज्यात गोवंश हत्या बंदी असूनही पोलीस तर स्वतःहून कारवाई करत नाहीत. गोरक्षक त्यांचा जीव धोक्यात घालतात, तेव्हा पोलीस तोंडदेखली कारवाई करतात. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि शासन यांना गोतस्करी किंवा अवैध गोमांस विक्री राज्यातून खरोखर थांबवायची आहे का ? असा प्रश्न पडतो ! धर्मांधांच्या मारहाणीत गोरक्षकाच्या जिवावर बेतले असते, तर त्याचे दायित्व गोतस्कर धर्मांधांना मोकाट सोडणार्या पोलिसांनी घेतले असते का ? |