|
मंड्या (कर्नाटक) – जिल्ह्यातील नागमंगल येथे ११ सप्टेंबरच्या रात्री धर्मांध मुसलमानांनी हिंदूंच्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर आक्रमण केले होते. या वेळी पोलिसांनी किमान ५० लोकांना अटक केली. यामध्ये दंगलखोर मुसलमानांसमवेत २३ हिंदु तरुणांनाही अटक करण्यात आली. हिंदूंनी कोणताच गुन्हा केलेला नसतांना त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांना आताही अटक केली जात आहे. यामुळे नागमंगल गावातील शेकडो हिंदु युवकांनी गाव सोडल्याचे समजते. यामुळे अजूनही प्रतिष्ठापित श्री गणेशमूर्तींच्या पूजेसाठी कुणीच नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गावात सध्या या तरुणांचे केवळ वयोवृद्ध आई-वडीलच उरले आहेत. ‘पोलिसांच्या भयामुळे आमच्या मुलांनी गाव सोडले आहे’, असा विलाप गावकर्यांनी व्यक्त केला.
निरपराध्यांना अटक केली, तर मोठे आंदोलन करू ! – भाजप
२५० पेक्षा अधिक निरपराध हिंदु युवकांच्या अटकेसाठी पोलिसांकडूनच कट रचला गेला आहे. जर निरपराध्यांना अटक केली, तर मोठे आंदोलन करू, असा संताप भाजपचे मंड्या जिल्हाध्यक्ष डॉ. एन्.एस. इंद्रेश यांनी व्यक्त केला आहे.
संपादकीय भूमिकाहा आहे काँग्रेसशासित राज्यातील पोलिसांचा हिंदुद्वेष ! |