Ajit Doval Vladimir Putin Meet : अजित डोवाल यांनी घेतली व्‍लादिमिर पुतिन यांची भेट

रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्‍लादिमीर पुतिन व  भारताचे राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

मॉस्‍को (रशिया) – भारताचे राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मॉस्‍कोमध्‍ये रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्‍लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. या वेळी दोघांमध्‍ये दोन्‍ही देशांतील परस्‍पर संबंध, रशिया-युक्रेन युद्ध आणि सुरक्षा या सूत्रांवर चर्चा झाली.

या वेळी पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्रिक्‍स शिखर परिषदेचे निमंत्रण दिले. पुतिन यांनी त्‍यांच्‍या संबंधित अधिकार्‍यांना ‘ब्रिक्‍स परिषदेच्‍या वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याशी स्‍वतंत्र द्विपक्षीय चर्चेचे आयोजन करावे’, असा आदेश दिला. या द्विपक्षीय बैठकीत गेल्‍या महिन्‍यात मोदी यांनी मॉस्‍को दौर्‍याच्‍या वेळी केलेल्‍या कराराच्‍या कार्यवाहीविषयी (अंमलबजावणीविषयी) चर्चा होणे अपेक्षित आहे.