आयोजकांनी केले अपात्र घोषित; भारताला सुवर्णपदक
पॅरिस – पॅराअॅथलीट नवदीप सिंह यांनी पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक एफ् ४१ या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. त्यांनी ४७.३२ मीटर अंतर पार करून फ्रान्सच्या राजधानीत भारताचे सातवे सुवर्णपदक निश्चित केले. या क्रीडा प्रकारात नवदीप सिंह यांनी दुसरे स्थान मिळवून रौप्यपदक जिंकले होते आणि इराणच्या सदेघ बाईत सयाह याने ४७.६५ मीटरसह सुवर्णपदक जिंकले होते; परंतु त्याने स्पर्धेच्या वेळी वादग्रस्तपणे झेंड्याचे प्रदर्शन करत गळा कापण्याचे हावभाव केल्याने त्याला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे नवदीप सिंह यांच्या रौप्यपदकाचे सुवर्णपदकात रूपांतर झाले.
स्वदेशाच्या ध्वजाखेरीज इतर कोणताही विशिष्ट चिन्ह असलेला ध्वज फडकावण्यास बंदी !
खरे तर सदेग सयाह याने सुवर्णपदक जिंकताच अरबी भाषेत मजकूर लिहिलेला काळा ध्वज बाहेर काढला आणि तो फडकावला. पॅराअॅथलेटिक्समध्ये, खेळाडूने त्याच्या देशाच्या ध्वजाखेरीज इतर कोणत्याही विशिष्ट चिन्हासह ध्वज प्रदर्शित करण्यास अनुमती नाही. काही लोक या ध्वजाला आतंकवादी संघटना ‘इस्लामिक स्टेट’चा झेंडादेखील म्हणत आहेत. या अयोग्य वर्तनामुळे त्याला सुवर्णपदक गमवावे लागले.
संपादकीय भूमिकाखेळ, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य आदी कुठल्याही धर्मांधांचे जिहाद हेच प्राधान्य असते, हे यावरून लक्षात येते ! खरे तर आयोजकांनी अशांना खेळण्यावर आजन्म बंदी घालायला हवी ! |