‘मी नेहमी सकाळी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील अन्नपूर्णा कक्षातील देवीची पूजा करते. त्यानंतर मी समष्टी प्रार्थना करते आणि दाही दिशांना नमस्कार करून उदबत्ती ओवाळते. मी प्रार्थना करत असतांना ‘अन्नपूर्णादेवी माझी प्रार्थना ऐकत आहे’, असे मला तिच्या मुखावरील हावभावावरून जाणवते. एकदा मी अन्नपूर्णा कक्षात प्रार्थना करत उदबत्ती फिरवत असतांना उदबत्तीची गरम विभूती माझ्या हाताच्या बोटांवर पडली. त्या क्षणी देवीने माझी चूक माझ्या लक्षात आणून दिली. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘उदबत्ती फिरवून प्रार्थना करण्यात अडथळा येतो. उदबत्ती एके ठिकाणी लावून ठेवायची आणि नंतर हात जोडून प्रार्थना करायची.’ माझ्या हे लक्षात आल्यावर मी लगेच त्याप्रमाणे कृती केली. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘आपली चूक आपल्या लक्षात आल्यावर देवताही आपल्याला सूक्ष्मातून साहाय्य करतात आणि हे साधना केल्यानेच साध्य होते.’
– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१.२०२१)
|