आज आपली संस्कृती, सीमा आणि हिंदू यांच्या रक्षणासाठी ‘राजकारणाचे हिंदुकरण’ करणे आवश्यक आहे. राजकारण म्हणजे केवळ निवडून येणे नाही. सध्याचे राजकारण स्वार्थी आणि कौटुंबिक झाले आहे.
शासनकर्त्यांकडे देशांच्या सीमांचे रक्षण करण्याचे दायित्व असते. अजून गोहत्या थांबलेली नाही. मंदिरे तोडली जात आहेत. हिंदूंची न्यून होत चाललेली संख्या, लव्ह जिहाद या सार्या समस्या आहेत. काँग्रेसने बनवलेला ‘मंदिर कायदा’ रहित करून मुसलमानांनी बळकावलेल्या ३ लाख मंदिरांचे पुनर्निमाण करायचे आहे. हे सर्व कायदे करण्यासाठी सरकारला भाग पाडले पाहिजे !
– श्री. मुन्नाकुमार शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारत हिंदु महासभा, देहली.