रामनाथी (गोवा) येथील श्री. कुशल गुरव यांचा आज (३१.८.२०२४ या दिवशी) वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
श्री. कुशल गुरव यांना ३० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !
१. श्री. कुशलदादांकडे अनेक सेवांचे दायित्व आहे. त्यांना एखादी सेवा मिळाल्यावर ‘ती सेवा मला जमणार नाही किंवा ही सेवा माझी नाही’, असे ते कधीच सांगत नाहीत. त्यांना प्रत्येक सेवा आपलीच वाटते. ते श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना अपेक्षित अशी सेवा होण्यासाठी प्रयत्न करतात.
२. माझ्याकडून सेवेच्या नियोजनात काही चुका रहात असतील, तर दादा मला लगेच त्या संदर्भात सांगून साहाय्य करतात.
– श्री. राजेश दोंतूल, सोलापूर.