Maulana Arshad Madani : (म्हणे) ‘राज्याराज्यांमध्ये मुसलमानांना मोठ्या संख्येने एकत्र आणून सरकारला जाब विचारू !’ – मौलाना अर्शद मदनी

वक्फ सुधारणा विधेयकावरून ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांची धमकी !

(मौलाना म्हणचे इस्लामचे अभ्यासक)

मौलाना अर्शद मदनी

नवी देहली – ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी वक्फ सुधारणा विधेयकावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, आमचा लढा सरकारच्या विरोधात आहे, आम्ही सरकारवर दबाव आणू. जर आम्हाला वक्फ कायद्यातील सुधारणा मान्य नसतील, तर आम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या ठिकाणी सरकार राजकारण करत आहे, त्या ठिकाणी मुसलमानांना एकत्र करू. इतक्या मोठ्या संख्येने एकत्र येऊ की, सरकारला उत्तर द्यावे लागेल.

मदनी पुढे म्हणाले की, सरकार सहस्रो मशिदी आणि ५० सहस्रांहून अधिक एकर भूमी कह्यात घेणार आहे. ही या सरकारची योजना आहे. सरकार त्यांची कागदपत्रे कुठून आणणार ? हे सरकार असे काही काम करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे मुसलमानांची हानी होईल. जगभरात असे लोक आहेत, जे मुसलमानांच्या विरोधात ठाम आहेत.

मदनी यांच्याकडून राहुल गांधी यांचे कौतुक !

मदनी यांनी राहुल गांधी यांचे कौतुक करतांना म्हटले की, राहुल गांधी यांनी म्हटले होते, ‘आम्ही प्रत्येक विचारवंताला त्यांच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य देऊ. याला ‘धर्मनिरपेक्षता’ म्हणतात.’ राहुल गांधी जे म्हणाले होते, त्यावर आमचा विश्‍वास आहे. (राहुल गांधी यांच्या काँग्रेसची धर्मनिरपेक्षता म्हणजे ‘हिंदूंवर अत्याचार आणि अल्पसंख्यांक यांच्या नावाने मुसलमानांवर सुविधांची उधळण’, अशी आहे. त्यामुळे मदनी यांनी राहुल गांधी यांचे कौतुक वाटणारच ! – संपादक)

संपादकीय भूमिका

केंद्र सरकारने अशा धमक्यांना भीक न घालता वक्फ कायद्यात सुधारणा करण्याऐवजी तो रहितच करणे आवश्यक आहे !