नाशिकमध्ये २ बांगलादेशी महिलांसह एक बांगलादेशी युवक अटकेत !

बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट झालेला भारत !

नाशिक – येथील पाथर्डी फाटा परिसरातून २ महिला आणि २२ वर्षीय युवक अशा ३ बांगलादेशी नागरिकांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांना सदनिका उपलब्ध करून देणार्‍या जाधव नामक व्यक्तीलाही अटक झाली आहे. दोन्ही महिला सौंदर्यवर्धनालयामध्ये काम करत होत्या. त्यांचीही चौकशी केली जाणार आहे.