शिकण्याची वृत्ती आणि सेवेची तळमळ असलेल्या फोंडा, गोवा येथील कु. मयुरी डगवार !

कु. मयुरी डगवार

१. सौ. तन्वी सीमित सरमळकर, फोंडा, गोवा.

सौ. तन्वी सीमित सरमळकर

१ अ. प्रेमभाव : ‘एकदा मी रुग्णाईत होते. तेव्हा कु. मयुरीने माझी विचारपूस करून मला चिकित्सालयात जाण्यासाठी साहाय्य केले.

१ आ. सेवेची तळमळ : ताई आश्रमात आलेल्या पाहुण्यांच्या संदर्भातील सेवा करते. ‘पाहुण्यांच्या सेवेत कुठलीही उणीव राहू नये’, यासाठी तिची धडपड असते. तिची धावपळ होत असली किंवा तिला त्रास होत असला, तरीही ती सेवा करते. एकदा तिचा दुचाकीवरून जात असतांना अपघात झाला. तेव्हा तिने सहसाधिकेला कळवून सेवेचे नियोजन केले. त्या वेळी तिला तोंडाला लागल्यामुळे नीट बोलता येत नव्हते. तेव्हा तिने त्या कालावधीत अन्य सेवा केल्या.’

२. सौ. कीर्ती प्रतीक जाधव, पाटणतळी, फोंडा, गोवा.

सौ. कीर्ती जाधव

२ अ. शिकण्याची वृत्ती : ‘ताई प्रत्येक सेवा मनापासून शिकते. आम्हाला एखाद्या सेवेच्या संदर्भात मत हवे असल्यास आमच्या डोळ्यांसमोर मयुरीचे नाव येते. तिला सेवेतील सर्व बारकावे ठाऊक असल्याने साधक तिला सेवेतील अडचणी विचारतात.

२ आ. सकारात्मक : ताईला शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होत असतांना ‘ती निराश किंवा हताश झाली आहे’, असे कधीच जाणवत नाही.

२ इ. : ताईला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे, तरीही तिने एखादी सेवा केली नाही, असे कधीच झाले नाही. सेवा करतांना तिला आध्यात्मिक त्रास होत असल्यास ती सेवा पूर्ण करून किंवा अन्य साधकाला सेवेविषयी सांगून नामजपादी उपाय करते.

२ ई. ताईला अनेक सेवांचा अनुभव आहे; मात्र त्याविषयी तिच्यामध्ये अहं जाणवत नाही.

२ उ. गुरूंप्रती भाव असणे : ताईमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या प्रती पुष्कळ भाव आहे. ताई परिस्थितीवर मात करता येण्यासाठी प.पू. डॉ. आठवले यांचा धावा आणि त्यांना प्रार्थना करते.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १६.४.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक