बेळगाव येथे गोवंशांची अवैध वाहतूक करतांना वाहन उलटले : ३ वासरांचा मृत्यू

बेळगाव – गोवंशांची अवैध वाहतूक करत असतांना कॅन्टर वाहन उलटल्याने ३ वासरांचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील चिक्कबागेवाडीजवळ घडली. वाहनातील चालक आणि अन्य २ जण पसार झाले. या वाहनामध्ये १२ गोवंशियांची वाहतूक केली जात असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ते उलटले. घटनास्थळी पोलिसांनी येऊन उर्वरित ९ गोवंश कह्यात घेऊन गोशाळेत पाठवून दिले. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

संपादकीय भूमिका

गोहत्या बंदी असतांनाही अवैधरित्या गोवंशांची वाहतूक होते आणि हत्या केली जाते, हे सरकार आणि पोलीस यांना लज्जास्पद !