Canada Indian Vs Khalistan Supporters : सरे (कॅनडा) येथे भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करतांना खलिस्तान्यांनी केला विरोध

भारतियांकडून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत असतांना विरोध करताना खलिस्तान समर्थक शीख

सरे (कॅनडा) – येथे भारताचा स्वातंत्र्यदिन भारतियांकडून साजरा करण्यात येत असतांना तेथे खलिस्तान समर्थक शीख मोठ्या संख्येने खलिस्तानी झेंडा घेऊन आल्याने तणाव निर्माण झाला.


दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती. या वेळी कॅनडाच्या पोलिसांनी परिस्थिती बिघडू नये, यासाठी खबरदारी घेतल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. ही घटना १५ ऑगस्टला गुरु नानक गुरुद्वाराबाहेर घडली. या गुरुद्वाराजवळच खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याची हत्या करण्यात आली होती.