Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार

काठमांडू (नेपाळ) – नेपाळमधील भारताला लागून असलेल्या सुनसरी जिल्ह्यात धर्मांध मुसलमानांनी केलेल्या दंगलीच्या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका हिंदु तरुणाचा मृत्यू झाला, तर हिंसाचारात पोलिसांसह अनेक जण घायाळ झाले. दंगलीनंतर प्रशासनाने काही भागांत अनिश्चित काळासाठी निर्बंध लादले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २६ जुलैच्या रात्री देवगंज ग्रामीण नगरपालिकेच्या कप्तानगंज भागात हिंदू आणि मुसलमान यांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. या वेळी भोंग्यांचा वापर आणि धार्मिक ध्वज लावणे यांवरून वाद चालू झाला. या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतांना सुरक्षादलांनी गोळीबार केला. यामध्ये २४ वर्षांचे ओम प्रकाश मेहता ठार झाले.

सुनसरी जिल्हा नेपाळच्या आग्नेय भागात वसलेले आहे, तसेच हा भाग भारताच्या बिहार राज्याच्या जवळ आहे. हा भाग दोन्ही देशांमधील एक महत्त्वाचा व्यावसायिक, तसेच वाहतूक मार्ग आहे.

संपादकीय भूमिका

  • नेपाळमध्ये ८१ टक्के हिंदु आहेत, तर केवळ ५ टक्के मुसलमान आहेत, तरी ते हिंदूंवर आक्रमण करतात, हे हिंदूंना लज्जास्पद !
  • पाकिस्तान आणि बांगलादेश या इस्लामी देशांतील हिंदू कधी मुसलमानांवर आक्रमण करण्याचे धाडस करू धजावतील का ? आणि केले, तर ते शिल्लक रहातील का ?