१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधकाला प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र प्रसाद म्हणून दिल्यावर ‘त्यांनी शाश्वत आणि सदैव स्मरणात रहाणारा प्रसाद दिला आहे’, याची साधकाला जाणीव होणे
‘काही वर्षांपूर्वी गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) मला गोवा येथून प्रसाद पाठवत होते किंवा मी गोवा येथे गेल्यावर ते मला प्रसाद देत होते. एकदा त्यांनी मला प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) छायाचित्र दिले. तेव्हा मला वाटले, ‘त्यांनी मला शाश्वत आणि सदैव स्मरणात राहील’, असा प्रसाद दिला आहे. तेव्हा माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांकडून मला प्रसाद मिळण्याचे प्रमाण अल्प झाले. तेव्हा ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असते’, हे त्यांनी मला शिकवले आहे’, असे लक्षात येऊन मला कृतज्ञता वाटली.
२. पू. रमानंद गौडा यांनी साधकाला प्रसाद देण्याच्या संदर्भात साधकाची झालेली विचारप्रक्रिया
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे संत, वय ४८ वर्षे) सत्संग झाल्यावर मला प्रसाद देत असत.
२ अ. एकदा मला त्यांच्याकडून प्रसाद मिळाला नाही. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘गुरुदेवांना अपेक्षित असे प्रयत्न करण्यास मी अल्प पडत आहे; म्हणून ते मला या माध्यमातून जाणीव करून देत आहेत.’ त्यानंतर मी हे सर्व विसरून गेलो.
२ आ. पू. रमानंद गौडा यांनी साधकाला तुळजाभवानी मातेचे चित्र असलेली दिनदर्शिका दिल्यावर साधकाची झालेली विचारप्रक्रिया : २६.३.२०२३ या दिवशी मी सेवेनिमित्त पू. रमानंद अण्णा यांच्याकडे गेलो होतो. त्या वेळी त्यांनी मला तुळजाभवानी मातेचे चित्र असलेली सुंदर दिनदर्शिका दिली. तेव्हा मला गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) स्मरण झाले. त्या वेळी मला वाटले, ‘आपल्यात निरपेक्षता आली की, गुरुदेवांकडून प्रसाद मिळतो.’ तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
३. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘गुरुदेवा, तुम्हाला अपेक्षित असे मी काही केले नाही, तरीही तुम्ही आणि संतांनी मला स्फूर्ती देऊन आधार दिलात’, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. ‘तुम्हीच मला तुम्हाला अपेक्षित असे घडवा’, अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो.’
– श्री. प्रशांत हरिहर, मंगळुरू (२६.३.२०२३)
|