सैनिक आणि पोलीस लुटत आहेत हिंदूंची घरे !
ढाका (बांगलादेश) – अशांततेचे वातावरण असलेल्या बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणे वाढत आहेत. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यास पोलीस आणि सैन्य टाळाटाळ करत आहेत. तेच या हिंसाचारामागे आहेत. गुप्तचरांतील सूत्रांनी सांगितले की, अनेक मूर्ती आणि मंदिरे नष्ट झाली आहेत. सैन्याकडून आश्वासन देऊनही बांगलादेशातील हिंदूंना वाचवण्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. किंबहुना सैन्य आणि पोलीसही घरे लुटत आहेत.
गुप्तचरांतील सूत्रांनी सांगितले की,
१. हिंदु कुटुंबांवर आक्रमणे केली जात आहेत. एका हिंदु प्राध्यापकाची हातोड्याने निर्घृण हत्या करण्यात आली. बांगलादेशात हिंदु कुटुंबांनी सर्वस्व गमावले आहे आणि आताही हिंदु संघटना उघडपणे बोलायला घाबरत आहेत.
२. हिंदूंवर केवळ कट्टरतावाद्यांकडून आक्रमणे होत नाहीत, तर हिंदूंचा विरोध ही आतंकवादी चळवळ बनत आहे. हे अनेक वर्षांपासून चालू असल्याने कोणतेही नेतृत्व त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. सौदी अरेबिया आणि आखाती देश येथून मोठ्या प्रमाणावर आलेला पैसा यांमुळे इस्लामी गटांना चालना मिळत आहे. सैन्य आणि पोलीस यांनी या इस्लामवाद्यांना मोकळे रान देणे, हा या गुंडांना पाठिंबा असल्याचा स्पष्ट संकेत आहे.
३. स्थानिक प्रसारमाध्यमे आणि ढाकामधील हिंदू अल्पसंख्याक गटांच्या अधिकार्यांच्या अहवालानुसार सध्या जवळपास ९७ ठिकाणी हिंदूंवर आक्रमणे झाली आहेत.
जानेवारी २०१३ पासून बांगलादेशात हिंदु समुदायावर सुमारे ४ सहस्र आक्रमणे
बांगलादेशात वर्ष २०१३ पासून हिंदूंवर ४ सहस्र आक्रमणे झाली आहेत, अशी माहिती गुप्तचरांच्या सूत्रांनी दिली आहे. ही पद्धतशीर आक्रमणे आहेत. शेख हसीना यांनी त्यागपत्र दिल्यानंतर चालू असलेला हिंसाचार उत्स्फूर्त नसून जाणीवपूर्वक आणि नियोजित आहे. यात अनेक घटकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सरकारी यंत्रणांची निष्क्रीयता आहे; कारण त्यांनी हे काही काळ चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता इस्लामी गटांना हिंदूंवर आक्रमणे करण्याचे कारण सापडले आहे आणि भारतीय धोरणे मुसलमानविरोधी आहेत.
संपादकीय भूमिकायातून स्पष्ट होते की, बांगलादेशात पुढे हिंदूंचे काय होणार आहे ! रक्षकच भक्षक असतील, तर काय होते, हे लक्षात येते ! भारत आता तेथील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी हस्तक्षेप करणार का ? असा प्रश्न निर्माण होतो ! |