हसीना यांना भारतात आश्रय घेतल्याचे प्रकरण
नवी देहली – भाजपच्या खासदार कंगना रणावत( Kangana Ranaut) यांनी ‘एक्स’वर पोस्ट प्रसारित करत बांगलादेशमधील राजकीय परिस्थितीवर मत मांडले आहे. त्या म्हणाल्या, ‘आपल्या सभोवताली असलेल्या सर्व इस्लामी प्रजासत्ताक देशांची मातृभूमी भारत आहे. बांगलादेशाच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना भारतात सुरक्षित वाटते, याचा आम्हाला अभिमान आहे; पण जे भारतात राहून विचारत असतात की, हिंदु राष्ट्र(Hindu Rashtra) का? रामराज्य का? त्यांना याचे उत्तर मिळाले असेल. इस्लामी देशांमध्ये मुसलमानही सुरक्षित नाहीत. अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान आणि ब्रिटन येथे जे घडत आहे, ते दुर्दैवी आहे. आम्ही नशीबवान आहोत की, आम्ही रामराज्यात रहात आहोत.’
Bharat is the original motherland of all Islamic Republics around us. We are honoured and flattered that honourable Prime Minister of Bangladesh feels safe in Bharat but all those who live in India and keep asking why Hindu Rashtra? Why Ram Rajya? Well it is evident why!!!
No… https://t.co/wMqlpBquUo— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 5, 2024