श्रीमद़्भगवद़्गीतेत भगवान श्रीकृष्णाने ‘सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नाश आणि धर्मसंस्थापना यांसाठी मी प्रत्येक युगात जन्म घेतो’, असे म्हटले आहे. त्यानुसार त्रेतायुगात श्रीरामाने रामराज्याची स्थापना केली, तर श्रीकृष्णाने द्वापरयुगात धर्मसंस्थापनेचे कार्य केले. सध्याच्या कलियुगातही धर्मग्लानी आल्यामुळे धर्मसंस्थापना करण्याची नितांत आवश्यकता आहे. महर्षींनी नाडीपट्टीत म्हटल्याप्रमाणे भगवंताने साक्षात् विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून धर्मसंस्थापनेचे कार्य हाती घेतले आहे. काळानुरूप कार्य करण्यासाठी एखादी संघटना किंवा संस्था असावी लागते; म्हणून धर्मसंस्थापनेचे व्यापक कार्य करण्यासाठी सनातन संस्थेची निर्मिती झाली आहे. आपण सनातन संस्थेच्या व्यापक कार्याचे काही पैलू पाहूया.
१. मनुष्यजन्माचे सार्थक होण्यासाठी म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी मार्गदर्शन करणारी सनातन संस्था !
अ. ‘आरंभी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले जिज्ञासू आणि साधक यांच्यासाठी सत्संग अन् अभ्यासवर्ग घेत असत. त्यांनी स्थापन केलेली सनातन संस्था ही आध्यात्मिक मार्गदर्शन करून संत बनवणारे गुरुकुल आहे. ही संस्था साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी एक दीपस्तंभ आहे.
आ. समाजव्यवस्था उत्तम राखण्यासाठी आवश्यक ते धर्मशिक्षण देणे, नैतिक मूल्यांचे संवर्धन करणे आणि कणखर व्यक्तीमत्त्व असलेल्या साधक अन् संत यांनी संपन्न असा समाज निर्माण करणे (रामराज्य निर्माण करणे) यांसाठी संस्था कार्यरत आहे.
इ. सनातन संस्था राष्ट्रप्रेम, राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण करण्यासाठी नागरिकांना सिद्ध करत आहे. परिणामी साधकांमध्ये ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भावना निर्माण होत आहे.
ई. ‘साधकांनी साधना करून मोक्षप्राप्ती करावी’, हा सनातन संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
२. सनातन संस्थेचे व्यापक कार्य
सनातन संस्थेचे व्यापक कार्य पुढीलप्रमाणे आहे. पुढील लिखाण मी अनुभवलेल्या प्रत्यक्ष घटना आणि प्रसंग यांवर आधारित आहे; परंतु विस्तार भयास्तव प्रसंगांचे वर्णन करू शकत नाही.
अ. नित्यनूतन अशी ‘सनातन संस्था’ !
आ. सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक यांच्या साधनेचे ध्येय गाठण्यास ‘सनातन संस्था’ साहाय्य करते.
इ. तळमळ, सातत्य आणि चिकाटीने जनप्रबोधन करणारी ‘सनातन संस्था’ !
ई. पैसा, प्रसिद्धी किंवा केवळ ‘लोकसंग्रह’ यांपासून दूर रहाणारी ‘सनातन संस्था’ !
उ. आर्थिक, राजकीय किंवा घराणेशाहीचे पाठबळ नसतांनाही धर्मजागृती, हिंदूसंघटन अन् राष्ट्ररक्षण यांसाठी समाजसेवा करणारी ‘सनातन संस्था’ !
ऊ. समाजाला हानी पोचवणार्या अयोग्य आणि मोठ्या प्रसंगात कुठे चुकले ? त्याचा भविष्यात काय परिणाम होईल ? आणि उपाययोजना काय असावी ? यांविषयी योग्य दृष्टीकोन देऊन कृतीशील विचार करण्यास प्रवृत्त करणारी ‘सनातन संस्था’ !
ए. वर्तमानकाळात घडत असलेले प्रसंग किंवा कार्यक्रम यांना अनुसरून, जागृती करून ‘योग्य कृती काय करू शकतो ?’, हे सुचवणारी ‘सनातन संस्था’ !
ऐ. करमणूक, खेळ यांपेक्षा ‘सध्याच्या कलियुगातील आपत्कालीन स्थितीत घडणार्या प्रसंगांत काय करू शकतो ?’, याविषयी जागृती करून योग्य ती कृती करवून घेणारी ‘सनातन संस्था’ !
ओ. कोणतीच संस्था समाजमनाचे समाधान करू शकत नाही. तत्त्वनिष्ठ राहून ‘समाजाला काय आवडते ?’ यापेक्षा ‘सद्य:स्थितीत समाजाला नैतिक, सामाजिक, कौटुंबिक, धर्म आणि राष्ट्र यांच्या स्तरावर कोणते कार्य करणे आवश्यक आहे ?’, याविषयी सांगून प्रत्यक्ष कृती करणारी तत्त्वनिष्ठ ‘सनातन संस्था’ !
औ. साधक, संत, भक्त, धर्मदाय न्यास आणि मंदिरांचे विश्वस्त यांना आपलेसे करून धर्मकार्य करणारी ‘सनातन संस्था’ !
अं. स्थूल आणि सूक्ष्म स्तरावर अफाट कार्य करणारी ‘सनातन संस्था’ !
क. समाजातील लोकांचे अज्ञान आणि वाईट शक्ती यांचे आवरण काढून ज्ञानशक्तीचा आनंद देणारी ‘सनातन संस्था’ ! (‘सनातन संस्थे’चे कार्य स्थूल आणि सूक्ष्म यांच्या स्तरांवर चालते. व्यष्टी साधना आणि समष्टी कार्य यांमध्ये येणार्या अडचणींवर आध्यात्मिक उपाय ‘सनातन संस्थे’च्या माध्यमातून सांगितले जातात.)
ख. समाजातील काही घटकांकडून सनातन संस्थेला विरोध होत असूनही सनातन संस्थेच्या जगभरातील कार्यात वाढ होत आहे.
ग. महर्षींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद यांच्या बळावर कार्य करणारी ‘सनातन संस्था’ !
घ. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटीबद्ध असलेली ‘सनातन संस्था’ !
माझी साधना आणि जीवन यांच्या प्रवासात मला ‘सनातन संस्था’ दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करून राष्ट्र अन् धर्म यांचे कार्य करवून घेत आहे. त्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि ‘सनातन संस्थे ’संबंधी सेवा करणार्या सर्व साधकांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.३.२०२४)
‘सनातन संस्था म्हणजे केवळ धर्मदाय न्यास, संस्था किंवा लोकांचा समूह नसून ते राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी एक चैतन्यमय व्यासपीठ आहे. ‘सध्या जगातील कुठल्याच धर्मादायी संस्थेला पूर्णत्व आहे’, असे आपण सांगू शकत नाही; परंतु संस्थेची गुणवैशिष्ट्येे आणि ईश्वरी कृपा यांमुळे ‘सनातन संस्था’ हळूहळू पूर्णत्वाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.’ |
|