US Revoked 9/11 Agreement : अमेरिकेने ‘९/११’च्‍या आतंकवादी आक्रमणातील आतंकवाद्यांना फाशी न देण्‍याचा करार केला रहित !

९/११ च्या आक्रमणाचा सूत्रधार खालिद शेख महंमद आणि अन्‍य २ आरोपींच्‍या समवेत झालेला करार रहित

वॉशिंग्‍टन (अमेरिका) : अमेरिकेतील न्‍यूयॉक शहरात ११ सप्‍टेंबर २००१ मध्‍ये ‘वर्ल्‍ड ट्रेड सेंटर’च्‍या २ इमारतींवर झालेल्‍या जिहादी आक्रमणातील आरोपींच्‍या समवेतील करार अमेरिकेने रहित केला आहे. हा करार त्‍यांना फाशीची शिक्षा देण्‍यात अडथळा ठरला होता, त्‍यामुळे आता या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होऊ शकते, असे मानले जात आहे.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्‍टिन

अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्‍टिन यांनी या आक्रमणाचा सूत्रधार खालिद शेख महंमद आणि अन्‍य २ आरोपींच्‍या समवेत झालेला करार रहित केल्‍याची घोषणा केली. या करारात आरोपींना फाशीची शिक्षा मागितली जाणार नाही, असे ठरले होते. या आक्रमणात ठार झालेल्‍यांच्‍या कुटुंबियांनी या कराराला कडाडून विरोध केला होता.