Paris Olympics : ‘पुरुष’ असूनही महिलांविरुद्ध बॉक्‍सिंग खेळणार्‍या इमेन खेलीफ याला जगभरातून विरोध !

  • पॅरिस ऑलिंपिक २०२४ ला गालबोट !

  • खेलीफ याला अनुमती देणार्‍या आंतरराष्‍ट्रीय ऑलिंपिक संघटनेचाही केला जात आहे निषेध !

  • खेलीफ याने महिला बॉक्‍सर एंजेला कॅरिनी हिच्‍यावर केवळ दोनदा प्रहार केल्‍याने अवघ्‍या ४६ सेकंदांत कॅरिनी हिने स्‍वीकारला पराभव !

इमेन खेलीफ(उजवीकडे )

पॅरिस (फ्रान्‍स) – येथे चालू असलेल्‍या ऑलिंपिक स्‍पर्धेला गालबोट लागले आहे. बॉक्‍सिंगच्‍या एका शर्यतीत पुरुष असलेल्‍या इमेन खेलीफ (Eman Khalif)  या खेळाडूने इटलीची महिला बॉक्‍सर एंजेला कॅरिनी (Angela Carini) हिचा पराभव केला. त्‍याने तिला दोन ‘पंच’ (मुक्‍के) मारल्‍यावर लगेच तिने पराभव पत्‍करला. यासंदर्भात तिने म्‍हटले की, आतापर्यंत माझ्‍या जीवनात मी एवढा मोठा प्रहार कधीच अनुभवला नव्‍हता. देशाशी मी आतापर्यंत प्रामाणिक राहिले आहे; परंतु या प्रसंगी मला माझ्‍या शारीरिक सुरक्षिततेला प्राधान्‍य द्यावे लागले. या प्रहारामुळे तिच्‍या नाकाचे अस्‍थीभंग झाल्‍याचे सांगितले जात आहे. या घटनेवरून आता आंतरराष्‍ट्रीय ऑलिंपिक संघटनेला विरोधाचा सामना करावा लागत आहे.

१. अनेक प्रथितयश लोकांनी संघटनेला धारेवर धरले असून ‘इमेन खेलीफ(Eman Khalif) या पुरुषाला महिला बॉक्‍सिंग शर्यतीमध्‍ये खेळण्‍याची अनुमती दिलीच कशी ?’, असा प्रश्‍न केला जात आहे. अमेरिकेतील अब्‍जाधीश इलॉन मस्‍क यांनी यावर म्‍हटले की, पुरुष महिलांच्‍या खेळात सहभागी होऊ शकत नाहीत !

. यात धक्‍कादायक सूत्र असे आहे की, जागतिक बॉक्‍सिंग संघटनेने इमेन खेलीफ याला गेल्‍या वर्षी नवी देहलीत झालेल्‍या जागतिक बॉक्‍सिंग स्‍पर्धेत अपात्र ठरवले होते; परंतु आंतरराष्‍ट्रीय ऑलिंपिक संघटनेने मात्र त्‍याला महिलांच्‍या विरोधात खेळण्‍यासाठी अनुमती दिली आहे.

३. जागतिक बॉक्‍सिंग संघटनेने खेळाडूंची निवड करतांना त्‍यांच्‍या लिंगाशी संबंधित तपासणीत त्‍यांच्‍यात ‘एक्‍स-एक्‍स’ (महिला) गुणसूत्र आहेत कि ‘एक्‍स-वाय’ (पुरुष) गुणसूत्र आहेत, याचा आधार घेतला होता. त्‍यात इमेन खेलीफ याच्‍यात ‘एक्‍स-वाय’ गुणसूत्र असल्‍याचे आढळले होते.

आंतरराष्‍ट्रीय ऑलिंपिक संघटनेची भूमिका !

दुसरीकडे आंतरराष्‍ट्रीय ऑलिंपिक संघटनेने मात्र यावर स्‍पष्‍टीकरण देत म्‍हटले आहे की, खेलीफ याच्‍या पारपत्रावर तो महिला असल्‍याचा उल्लेख आहे. तसेच गेल्‍या वर्षाच्‍या जागतिक बॉक्‍सिंग संघटनेच्‍या निर्णयाचा हवाला देत आमच्‍यावर टीका केली जात आहे, ते अयोग्‍य आहे. जागतिक बॉक्‍सिंग संघटनेने योग्‍य ती प्रक्रिया पूर्ण केली नाही. खेलीफ हा गेल्‍या अनेक वर्षांपासून विविध खेळांमध्‍ये महिला म्‍हणूनच सहभागी होत आला आहे.

‘वोकिझम’विषयी हिंदु समाजाचे डोळे उघडणारी अभिजित जोग यांची मुलाखत लवकरच प्रसारित होणार !

साम्‍यवादाचा आधुनिक नि भयावह प्रकार असलेला ‘वोकिझम’ म्‍हणजे नेमके काय, ही विकृती पाश्‍चात्त्य देशांत कशा प्रकारे फोफावत आहे, या माध्‍यमातून मुलांना त्‍यांच्‍या आई-वडिलांपासून कशा प्रकारे दूर नेले जात आहे, अशा अनेक विषयांवर ‘सनातन प्रभात’ने साम्‍यवादाचे गाढे अभ्‍यासक आणि लेखक श्री. अभिजित जोग यांची नुकतीच मुलाखत घेतली. ही मुलाखत लवकरच ‘सनातन प्रभात’च्‍या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध केली जाणार आहे, याची वाचकांनी नोंद घ्‍यावी.

संपादकीय भूमिका

  • मानवाला त्‍याचा लिंग ठरवण्‍याचा अथवा पालटण्‍याचा अधिकार आहे, अशी विचित्र पद्धत पाश्‍चात्त्य देशांत चालू असून याला साम्‍यवादाचे आधुनिक रूप म्‍हणजेच ‘वोकिझम’ म्‍हटले जाते. याचाच आधार घेत इमेन खेलीफ हा स्‍वत:ला महिला म्‍हणवतो. या विकृतीला आंतरराष्‍ट्रीय ऑलिंपिक संघटनाही बळी पडली आहे, हेच या घटनेतून समोर येते !
  • अशा प्रकारच्‍या निसर्गविरोधी प्रकारांचा जागतिक समुदायाकडून जोरदार विरोध झाला पाहिजे. संस्‍कृती आणि सभ्‍यता यांचे उगमस्‍थान असलेल्‍या भारताने या विरोधाचे नेतृत्‍व केले पाहिजे !